"स्वच्छता ही सेवा” अंतर्गत वसई - विरार येथे पथनाट्याचे आयोजन

    02-Oct-2023
Total Views | 89

swachta abhiyan


वसई :
"स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास" या मोहिमेत रविवारी १ ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा, कातकरी पाडा, मानवेल पाडा रोड, विराट नगर/ विरार बस डेपो, विरार महानगर पालिका (विरार पूर्व), अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून सर्व भारतीयांना स्वच्छतेची प्रेरणा दिली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा २०२३’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची संकल्पना ‘कचरामुक्त भारत’ ही होती. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून, यामध्ये स्वयंस्फूर्तीने श्रमदान करणे गरजेचे होते.

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छभारत "स्वच्छता ही सेवा एक तारीख एक तास" या अभियाना अंतर्गत विवि़ध भागात जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आयोजित करण्यात आले. या पथनाट्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. या अभियानात प्लास्टिक वापर व दुष्यपरिणाम याबाबत विषेश जनजागृती करण्यात आली. ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यातून उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भित्तीचित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेट्या ठेवणे यांसारख्या उपक्रमांबद्दल जनजागृती करण्यात आली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121