मुंबई : 'इंडिया एक्झिम बँक'अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एक्झिम बँकद्वारे विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिकृत वेबसाईट लिंक खुली करण्यात येणार आहे.
एक्झिम बँकद्वारे होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून एकूण ४५ पदे भरणार आहेत ज्यांना बँकिंग ऑपरेशन डिजिटल टेक्नॉलॉजी, राजभाषा आणि अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर ट्रेनीपदासाठी भरती केली जाणार आहे. तसेच, अर्जदारांकडून अर्जशुल्क आकारले जाणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांकडून १०० अर्जशुल्क आकारले जाणार आहे.
एक्झिम बँकेत भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून दि. १० नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. तसेच, भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.