नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता हिंदुस्तानी भाऊने ही उदयनिधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणाले की, " सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा असून त्याला नष्ट करायला हवे, असे विधान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी लक्षात घ्यावे की, सनातन धर्म संपवण्यासाठी असे अनेक जण आले. पण सनातम धर्म संपला नाही, तर ते लोकचं संपले. तसेच हिंदुस्तानी भाऊ एकटा कट्टर आहे. त्यामुळे माझ्यासारखे अनेक जण असतील, म्हणून सनातन संपवण्याची भाषा करणारे दिसणार देखील नाही, अशी परिस्थिती निर्माण करू." असे हिंदुस्तानी भाऊ म्हणाले.
तसेच काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यत जेवढी ताकद आहे. तेवढी लावा पण हिंदुस्तानी भाऊ एक शिडी तुमच्या वरचढ आहे, हे लक्षात घ्यावे असा इशारा ही हिंदुस्तानी भाऊंनी उदयनिधी स्टॅलिन यांना दिला. दरम्यान दुसरीकडे मुकचे नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या विधानावरील प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयात सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे सार्वजनिक पदावर राहून त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात हिंदू संघटनानी याचिका दाखल केली होती.
उदयनिधीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पी विल्सन यांनीही सांगितले की, संविधानाचे कलम २५, जे धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार देते. हे लोकांना नास्तिकतेचे पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार देखील देते.विल्सन यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अनिता सुमंत यांच्यासमोर सांगितले की, कलम २५ हे कलम १९(१) (a) (स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती) मंत्र्यांच्या भाषणाचे स्पष्टपणे संरक्षण करते.