फ्रेयर एनर्जीच्या वतीने सौर संक्रमणाला चालना देण्यासाठी ईडीएफआय ElectriFI च्या नेतृत्वाखाली सिरीज B फेरीत रू. 58 कोटी उभारले

    18-Oct-2023
Total Views | 19
 
 
 
Saurabh Marda
 
 
फ्रेयर एनर्जीच्या वतीने सौर संक्रमणाला चालना देण्यासाठी ईडीएफआय ElectriFI च्या नेतृत्वाखाली सिरीज B फेरीत रू. 58 कोटी उभारले
 
 
फ्रेयर एनर्जी, भारतातील आघाडीची तंत्रज्ञानक्षम छतांवर बसविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा सुविधा (रूफटॉप सोलर) कंपनीने रू. 58 कोटींची इक्विटी गुंतवणूक सुरक्षित केली आहे.भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी (घरमालक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) सौरऊर्जेशी निगडीत संक्रमणाला गती देणाऱ्या शाश्वत बदलांत फ्रेयर एनर्जी आघाडीवर आहे.
 
 
या फेरीचे नेतृत्व ईडीएफआय ElectriFI, ईडीएफआय मॅनेजमेंट कंपनी द्वारे व्यवस्थापित ईयू-अनुदानित इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटीने USD 3 दशलक्ष गुंतवणूक केली होती.या फेरीत सहभागी झालेले इतर गुंतवणूकदार म्हणजे Schneider Electric Energy Asia Fund (SEEAA),लोटस कॅपिटल एलएलसी, मेब्राइट व्हेन्चर्स आणि व्ही टी कॅपिटल.
 
 
रॉड्रिगो मद्राझो (ईडीएफआय मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ) यांनी या परिवर्तनशील गुंतवणुकीसाठी उत्साह व्यक्त करत ते म्हणाले, ‘भारतातील किरकोळ क्षेत्रासाठी सौर बाजार अत्यंत विखंडित आणि अव्यवस्थित आहे.या संदर्भात, किरकोळ ग्राहकांना सौरऊर्जेकडे अखंडपणे संक्रमण करण्याची आणि त्यांची वीज बिले कमी करण्याची परवानगी देण्यासाठी तंत्रज्ञान आणि ग्राहक वित्तपुरवठा यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर सोल्यूशन्स आणण्यासाठी फ्रेयर एनर्जी सोबत टीम-अप करण्याची संधी आम्हाला दिसत आहे.ईडीएफआय MC मध्ये, जगातील विविध भागांतील समविचारी गुंतवणुकदारांसह हा इक्विटी व्यवहार केल्याचा आम्हाला अभिमान आहे.’
 
 
SEEAA चे अध्यक्ष गिल्लेज् वेरमोट् देसरोचेस पुढे म्हणाले: “आमचा विश्वास आहे की फ्रेयर एनर्जी मध्ये स्वच्छ ऊर्जा उत्पादनापासून स्मार्ट ऊर्जा वापरापर्यंत विस्तार करून भारतातील ऊर्जा संक्रमणाला चालना देण्याची क्षमता आहे. हे द्रष्टेपण तसेच नेतृत्व संघाची गुणवत्ता आणि व्यावसायिकता यामुळेच आम्हाला 2 वर्षांपूर्वी फ्रेयर एनर्जी मध्ये गुंतवणूक करण्यास आणि सिरीज B पर्यंतच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहन दिले.आतापर्यंतच्या कामगिरीने आम्ही उत्साहित आहोत आणि पुढच्या वाटचालीसाठी वाट पाहू शकत नाही,समविचारी सह-गुंतवणुकदारांसोबत,आम्ही कंपनीला आणखी समर्थन देऊ शकतो.
 
 
तसेच व्यवहारावर भाष्य करताना, अभिषेक अग्रवाल (संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार, लोटस कॅपिटल एलएलसी) म्हणाले,“भारताच्या किरकोळ क्षेत्राचा वाटा एकूण वीजवापराच्या 50% पेक्षा जास्त आहे. रुफटॉप सोलर आज या ऊर्जा प्रकारात 2% पेक्षा कमी आहे.सौर उर्जा, जी ग्रिड उर्जेपेक्षा 60% कमी खर्चिक आहे, बाजारपेठेत भरीव संधी सादर करते. फ्रेयर एनर्जी बाजारातील हुकमी एक्का बनण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण आर्थिक आणि पर्यावरणीय प्रभाव निर्माण करण्यासाठी खूप चांगल्या स्थितीत आहे”.
 
 
राधिका आणि सौरभ (सह-संस्थापक, फ्रेयर एनर्जी) म्हणाले, ‘आम्ही या निधी उभारणीबद्दल आणि ऑन-बोर्ड समविचारी गुंतवणूकदार आणण्याबद्दल उत्साहित आहोत. या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भारतीय रिटेल ग्राहकांना सक्षम बनवण्याच्या फ्रेयर एनर्जीच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते आणि आम्हाला आमचा संघ तयार करण्यासाठी, उत्पादन विकास आणि मार्केटिंगमध्ये जलद गतीने पुढे जाताना गुंतवणूक करण्याची परवानगी मिळेल.’
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121