मुंबई : ‘हमास’च्या हल्ल्यापासून प्रेरणा घेत काही कट्टरतावादी पुन्हा एकदा ’काश्मीर हे मुस्लिमांचेच आहे,’ असे दाखवत इतर धर्मीयांना येथे स्थान नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने अधिकृतपणे इस्रायलला पाठिंबा दिला असतानाही काही कट्टरतावादी ‘हमास’च्या प्रवृत्तीचे समर्थन करत आहेत. त्यात काँग्रेसची भूमिका ही पुन्हा एकदा विचार करण्यास्पद आहे. त्यातच आता काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील हिंदू आणि शीख बांधवांच्या घरावर ‘घर सोडून चालते व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा धमकीवजा इशारा कट्टरतावाद्यांनी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेसचा नाहक जळफळाट!
अमानवी कृत्य करत जिहादी इस्लामची हाक एखाद्या कट्टरपंथीय गटाने दिली, तर जगभरातील त्याच प्रवृत्तीची मंडळी स्वाभाविकपणे पाठिंबाच देणार. काँग्रेस अशा कट्टरपंथीयांचे लांगूलचालन करणारा, त्यांचे तळवे चाटणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या ‘हमास’ समर्थनार्थ भूमिकेला देशातील मुसलमान समाजाकडून अपेक्षित समर्थन मिळाले नाही. त्यामुळे आता अशा कट्टरतावाद्यांचा राग समाजमाध्यमातून किंवा घरांवर पोस्टर लावण्यातून दिसतो.
-सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
‘तेव्हा’ काँग्रेस झोपली होती का?
काँग्रेस पक्ष आज खुलेआम ‘हमास’चे समर्थन करत आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे काही घडलं, तेव्हा त्यांचीच सत्ता होती. तेव्हा काँग्रेस झोपली होती का? सत्तेत असूनही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही. हमासची लढाई इस्रायल सरकार विरोधात असेल, तर महिला, लहान मुले यांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करणं ही कोणती माणूसकी? धर्माच्या नावाखाली काश्मिरी पंडितांसोबतही असेच कृत्य झाले होते.
-शक्ती मुन्शी, काश्मिरी हिंदू (पंडित)
इस्लामिक दहशतवाद
‘हमास’ ही पूर्णतः इस्लामिक दहशतवाही संघटना आहे. त्यांना लोकशाहीशी काही देणं-घेणं नाही. त्यांचे कृत्य हे मानवजाती विरुद्ध आहे. ‘हमास’चे समर्थन करणारे यापूर्वीही अशा कृत्यांच्या समर्थनार्थ उतरलेच होते. काश्मीरमधील हिंदूंवर अत्याचार झाले तेव्हा कोणीही आवाज उठवला नव्हता. इस्लामिक दहशतवाद आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही.
- शेफाली वैद्य, लेखिका
‘हमास’ समर्थक देशद्रोही‘
हमास’ला समर्थन करणे म्हणजे आपल्या भारताच्या विरोधात असलेल्या, भारतावर वारंवार हल्ले करणार्या प्रवृत्तीला समर्थन करण्यासारखे आहे. अशा ‘हमास’ समर्थकांवर दोशद्रोहाचे खटले चालविले पाहिजेत. काश्मिरी पंडितांचे हाल होत असताना जी लोकं काश्मिरी पंडितांसाठी कधी पुढे आले नाहीत, तेच आज ‘हमास’ला सर्रास समर्थन देत आहेत.
-नितेश राणे, आमदार, भाजप