मुंबई : 'भारत डायनामिक्स लिमिटेड'अंतर्गत अॅप्रेंटिसशीपसाठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारत डायनामिक्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अॅप्रेंटिसशीप पदाच्या एकूण ११९ जागा भरल्या जाणार आहेत.
भारत डायनामिक्स लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मेकॅनिकल, सिव्हिल आणि केमिकल या अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल, पदवीधर या दोन वर्गवारीत ही भरती केली जाणार आहे.
उमेदवारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. या भरतीकरिता अर्जदारास वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. तसेच, भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.