गाझातील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू
18-Oct-2023
Total Views | 200
मुंबई : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता चांगलेच चिघळले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यात ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. १७ ऑक्टोबर रोजी अल-अहली हॉस्पिटलवर हा हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलच्या सैन्याने हे आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, हा हवाई हल्ला आतापर्यंतच्या पाच हल्ल्यांमधील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. अल अहली रुग्णालयावरील हल्ल्याच्या फोटोंमध्ये इमारतीला आग लागल्याचे दिसत आहे. तुटलेल्या काचा इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. तसेच रुग्णालयात सर्वत्र मृतदेह विखुरलेले आहेत. या रुग्णालयात अनेक पॅलेस्टिनी नागरिक आणि जखमी आश्रयास होते. त्यातील ५०० जणांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, इस्त्रायस-हमास युद्धात आतापर्यंत हजारों निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलींना ओलिस घेतले असून त्यांच्यावर अत्याचार अद्याप सुरुच आहे. इस्त्रायली सैन्याने गाझाला चारही बाजूंनी घेरले आहे आणि इस्त्रायली सैनिकांकडून गाझावर बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत.