BEL Recruitment 2023 : अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी!

    17-Oct-2023
Total Views |
Bharat Electronics Limited Recruitment 2023

मुंबई :
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीद्वारे प्रोबेशनरी इंजिनियर्स पदाच्या एकूण २३२ जागा भरल्या जाणार आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत अनेक पदांसाठी प्रोबेशनरी इंजिनीअर्सची भरती केली जात आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' अंतर्गत पुढील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

प्रोबेशनरी अभियंता : २०५ पदे

प्रोबेशनरी अधिकारी : १२ पदे

प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर : १५ पदे

विविध पदांच्या रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

प्रोबेशनरी अभियंता : उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात B.E / B.Tech / B.Sc पदवीधर असणे आवश्यक आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर : दोन वर्षे एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन / पर्सोनल मॅनेजमेंट.

प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर : उमेदवाराने CA / CMA पूर्ण केलेले असावे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121