आयटी क्षेत्राचे विस्तारणारे क्षितीज

    16-Oct-2023
Total Views | 76
 E-Commerce

भारताच्या आयटी क्षेत्राने जगभरात आर्थिक मंदी असतानाही महसुलात वाढ नोंदवली आहे. भारतात होत असलेले वाढते ‘डिजिटलायझेशन’, ‘एआय’ तसेच ‘मशिन लर्निंग’चा वाढता वापर आणि ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची होत असलेली विक्रमी वाढ आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे. त्याविषयी...

गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जगभरात त्याचे आर्थिक पडसाद उमटले. सर्वाधिक रोजगार कपात अमेरिकेसह युरोपने अनुभवली. भारतीय आयटी कंपन्यांना मात्र सुदैवाने अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले नाही. कार्यालयात पोहोचल्यावर कामावरून कमी करण्यात आल्याचे काहींना सांगण्यात आले, तर काहींना ई-मेलवरून त्याची माहिती देण्यात आली. भारतात त्याची तीव्रता कमी होती. म्हणूनच आजघडीला जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी क्षेत्राने नोंदवलेली वाढ, ही म्हणूनच उल्लेखनीय ठरते. सर्व उपक्षेत्रांनी दुहेरी महसूल वाढ दर्शवली आहे. डिजिटल परिवर्तन सेवांसाठी असलेली जोरदार मागणी, ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘मशीन लर्निंग’चा वाढता वापर, ‘ई-कॉमर्स’ आणि इतर डिजिटल व्यवसायांची होत असलेली विक्रमी वाढ भारतीय आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे.

एका अहवालानुसार, कुशल ‘एआय’ व्यावसायिकांना आयटी क्षेत्रात वाढती मागणी असून, विश्लेषण व्यवस्थापक, डाटा अभियंते, क्लाऊड सिस्टम मॅनेजर आदींसाठी मोठे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. ‘गेमिंग’, ‘सायबरसुरक्षा’, ‘वेब ३’, ‘ब्लॉकचेन’ यांसारख्या क्षेत्रांची वाढ होत असून, तेथे रोजगार उपलब्ध आहेत; तसेच मागणीही कायम आहे. गेल्या महिन्यात या क्षेत्रात ४५ हजार रोजगार उपलब्ध झाले. टेक क्षेत्र नऊ टक्के वाढीसह आर्थिक वर्षात बंद होईल. गेल्या वर्षीच्या २४५ अब्ज डॉलरच्या तुलनेत ते २४५ अब्ज डॉलर इतकी वाढ नोंद करेल. यंदाच्या आर्थिक क्षेत्रात होत असलेली वाढ आयटी क्षेत्राचा पाया किती मजबूत आहे, हे तर दाखवतेच. शिवाय ते लवचिक असल्याचेही दिसून येते. सध्या काही आव्हानांचा सामना त्याला करावा लागत असला तरी ही स्थिती फार काळ कायम राहणार नाही, असे या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील रोजगारात २५ टक्क्यांची घट दिसून येते. तसेच चार प्रमुख कंपन्यांनी तिसर्‍या तिमाहीत केवळ १ हजार, ९४० कर्मचार्‍यांची भर घातली. गेल्या आठ तिमाहीतील ती सर्वात कमी असल्याचे मानले जाते. बहुतेक कंपन्यांनी नवीन भरतीची प्रक्रिया मंद केली असून, लगेचच नोकरी हवी असेल, तर कमी वेतनाचा पर्याय खुला ठेवला आहे, असे असतानाही भारतात टाळेबंदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा केला जात आहे. ‘अ‍ॅमेझॉन’, ‘गिटहब’, ‘एक्सेंचर’ या कंपन्यांनी ती लागू केली असली, तरी उपलब्ध रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. भारतातील ‘स्टार्टअप्स्’नी पाच हजारांपेक्षा कमी जणांना कमी केल्याचे वृत्त आहे. सहा टक्के कंत्राटी कामगारांनी नोकर्‍या गमावल्या असल्याचे ‘इकोनॉमिक टाईम्स’ने नमूद केले आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या मते, भारतीय आयटी उद्योगाने ५.१ दशलक्ष लोकांना थेट रोजगार दिला असून, सहा महिने या क्षेत्रातील अस्थिरतेचे वातावरण कायम राहणार आहे. जे व्यावसायिक त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी मात्र उज्ज्वल भविष्य असल्याचे, हा अहवाल सांगतो.


भारतातील आयटी उद्योगाचे भविष्यच बदलून टाकणारे, अनेक नवे प्रवाह उदयास येत आहेत. यात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’, ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सायबरसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. येत्या काही वर्षांत भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच कुशल आयटी व्यावसायिकांची मागणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

विकसित होणारे क्षेत्र

आयटी हे सतत विकसित होणारे क्षेत्र. म्हणूनच यातील व्यावसायिकांना स्पर्धेत राहण्यासाठी कौशल्ये सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ‘कोडिंग’, ‘डाटा अ‍ॅनालिसिस’ तसेच ‘मशिन लर्निंग’ यांसारख्या कौशल्यांची मागणी वाढणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ग्राहकांकडून सायबरसुरक्षा सेवांना मोठी मागणी आहे. गेल्या वर्षभरात भारतातील सायबर सुरक्षा व्यावसायिकांसाठी नोकरीच्या संधी ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यांना वेतनही आकर्षक मिळत आहे. भारतातील सायबरसुरक्षा विश्लेषकाचा सरासरी पगार प्रतिवर्ष ६ लाख, ३३ हजार, ४७० रुपये इतका आहे. अनुभवावर आणि कौशल्यांवर तो वाढू शकतो. तथापि, अन्य आयटी व्यावसायिकांच्या सरासरी वेतनापेक्षा तो अधिक असतो, हे नक्की.भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्राची व्याप्ती खूप विस्तृत असून, हे व्यावसायिक आयटी, बँकिंग, वित्त, आरोग्यसेवा, तसेच केंद्र सरकारसह विविध उद्योगांमध्ये काम करू शकतात. सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा अभियंता आणि सुरक्षा आर्किटेक्ट असे काम करण्याची संधी त्यांना मिळते.

व्यवसायांचे वाढते ‘डिजिटायझेशन’, ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ आणि मोबाईल उपकरणांचा वाढता अवलंब यांमुळे नवीन सुरक्षा आव्हाने निर्माण होत आहेत. सायबर हल्ल्यांच्या वाढत्या अत्याधुनिकतेमुळे संस्थांना स्वतःचे संरक्षण करणे अधिक कठीण होत आहे. भारतासह जगभरातील संस्थांसाठी कुशल सायबरसुरक्षा व्यावसायिकांची कमतरता, या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ आणि ‘मशीन लर्निंग’च्या वाढीचा सायबर सुरक्षा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत आहे. ‘एआय‘ आणि ‘मशिन लर्निंग’चा वापर नवीन सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी आणि विद्यमान सुरक्षा उपायांची प्रभाविता सुधारण्यासाठी केला जात आहे. भारतातील सायबरसुरक्षा क्षेत्राचा येत्या काही वर्षांत विस्तार होणार असून, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्राची व्याप्ती आणि विस्तार पाहता, येथे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. म्हणूनच हे क्षेत्र येत्या काळातही सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरणार आहे.


- संजीव ओक

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121