हमासविरुद्धच्या युद्धात इस्त्रायलला ब्रिटनचे समर्थन!
15-Oct-2023
Total Views | 47
मुंबई : इस्त्रायल आणि हमासमध्ये अद्याप युद्ध सुरुच आहे. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक देशांनी इस्त्रायलला आपला पाठिंबा दिला आहे. तर अनेक कट्टरपंथीयांनी हमासच्या दहशतवाद्यांना समर्थन दिले आहे. यानंतर आता ब्रिटननेही इस्त्रायलला आपले समर्थन दिले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आम्ही इस्त्रायलच्या पाठीशी आहोत, असे म्हणत इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. "इस्रायलमधील निष्पाप बळींवरील हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, मी प्रादेशिक स्थिरता वाढवण्यासाठी आमचे जागतिक दर्जाचे सैन्य तैनात केले आहे," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच मी ब्रिटीश ज्यू समुदायाच्या पाठीशी असून तुमच्या रक्षणासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचेही ऋषी सुनक म्हणाले आहेत. इस्त्रायलमध्ये झालेला हल्ला भीषण असून त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. अनेक लोकांना त्यांच्या कुटुंबापासून दूर करुन त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रिटन इस्त्रायलच्या पाठिशी असून त्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ऋषी सुनक म्हणाले आहेत.