‘शिवशौर्य यात्रे’चे पालघरमध्ये भव्य स्वागत

    14-Oct-2023
Total Views | 66
shivshaurya


पालघर :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं व विश्वहिंदू परिषदेला ६० वर्षं पूर्ण होत आहेत. या दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने बजरंगदल आयोजित ‘शिवशौर्य यात्रे’चे पालघर जिल्ह्यातील मनोर येथे आगमन झाले. स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती.

महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या घातल्या होत्या. व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ बंद ठेवून यात्रेत सामील झाले होते. अनेक ठिकाणी शिव प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आसमंत दुमदुमू टाकण्यार्‍या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देत रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. नंतर या यात्रेचे रुपांतर भव्य सभेत झाले.

या सभेत बोलताना मुख्य प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आपल्या हृदयात असावे व घराघरात शिवाजी जन्माला यावे. ५०० वर्षे हिंदूंनी राम मंदिरासाठी केलेला संघर्ष व प्रत्यक्षात होत असलेली राम मंदिराची उभारणी, हे हिंदूंच्या एकतेचे उदाहरण आहे. दोन साधूंच्या हत्येमुळे पालघर जिल्ह्यावर लागलेला बदनामीचा कलंक पुसण्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन गोवंश हत्या थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारसेवक नारायण भोईर यांचा सत्कार करण्यात आला.

वसईत यात्रेचे जंगी स्वागत

छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कोकण प्रांताकडून गोवा ते डहाणू या मार्गावर शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यात, या यात्रेचा प्रवेश झाला. खानिवडे गावात या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या उपस्थितीबरोबर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त होता. ही यात्रा विरार फाटामार्गे विरार शहर ते पुढे नालासोपारा आणि वसई अशी मार्गस्थ झाली. वसईतील नरवीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याची साक्ष म्हणून उभ्या असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पांच्या स्मारकात या यात्रेचा समारोप झाला.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121