मुंबई : सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी अहमदनगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील हेरंब कुलकर्णींच्या घरी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांनी हेरंब कुलकर्णी यांची विचारपूस केली. पण यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत खुप साऱ्या कॅमेरामॅन देखील घेऊन गेल्या होत्या. यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. लोकांनी त्यांना असंवेदनशील राजकारणी म्हटले आहे. सुप्रिया सुळे ज्यावेळी हेरंब कुलकर्णींच्या घरातील महिलांशी बोलत होत्या. त्यावेळी त्या महिला भावनिक झालेल्या होत्या.
अशावेळी सुद्धा सुप्रिया सुळे यांचे लक्ष कॅमेराकडे होते, अशी टीका त्यांच्यावर सोशल मिडियातून होत आहे. व्हिडिओमध्ये पण तेच दिसत आहे. सुप्रिया सुळे या व्हिडिओमध्ये रडणाऱ्या महिलेला सांत्वन देण्याच्या जागी त्या कॅमेराकडे बघताना दिसत आहे.