इंडी आघाडीतून 'केजरीवाल' बाहेर? आप स्वबळावर लढवणार 'या' राज्यातील निवडणूका

    12-Oct-2023
Total Views | 53
arvind kejriwal 
 
मुंबई : निवडणूक आयोगाने राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली होती. या पाच राज्यांमध्ये ७ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत निवडणूका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यापासून या पाचही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली आहे.
 
या ५ राज्यांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळेच या तिन्ही राज्यांमध्ये इंडी आघाडी काँग्रेसला आणि एनडीएतील घटकपक्ष भाजपला मदत करतील अशी आशा होती. पण काँग्रेसला इंडी आघाडीतील आम आदमी पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे.
 
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांनी केली आहे. ते म्हणाले की, "इंडी आघाडी ही लोकसभेच्या निवडणूका एकत्र लढण्यासाठी बनवण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही या राज्यांच्या विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्यास स्वातंत्र्य आहोत."
 
या तिन्ही राज्याच्या निवडणूका लढण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्ष आपल्या निर्णयावर कायम राहिल्यास इंडी आघाडीत फुट पडू शकते, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121