मुंबई : पाकिस्तान विरुध्द श्रीलंका यांच्यात हैदराबाद येथे विश्वचषकाचा आठवा सामना सुरू आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ९ बाद ३४५ धावांचा डोंगर उभा केला आहे. श्रीलंकेकडून सर्वाधिक कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा यांनी अनुक्रमे ७७ चेंडूत १२२ धावा तर ८९ चेंडूत १०८ धावा केल्या आहेत. या दोघांच्या खेळीवर श्रीलंकेने धावांचा रतीब घातला आहे.
श्रीलंकेने आजवरच्या विश्वचषक इतिहासात पाकिस्तानसमोर ३४५ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. तर पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स हसन अलीने (४) घेतल्या. तर हसन रौफने २ बळी घेतले. पाकचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ९ षटकांत ६६ धावा देत १ विकेट घेतली.