मुंबई : मुंबईकरांना टोल भरताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. टोलदरात वाढ करण्यात आली असून मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवर टोल वाढ लागू करण्यात आली आहे. या टोल वाढीमुळे नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या वाढीव दरामुळे मुंबईत प्रवेश करणे आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांना टोल भरताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आधी चार चाकी वाहनांसाठी ४० रुपये टोल होता. त्यात पाच रुपयांनी वाढ तर मिनी बससाठी ६५ रुपये, ट्रकसाठी १३० रुपये आणि अवजड वाहनासाठी १६० रुपये टोल द्यावा लागत होता. यामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली आहे.
असा असेल टोलचा नवा दर!
छोटी वाहने – ४५ रुपये
मध्यम अवजड वाहने – ७५ रुपये
ट्रक आणि बसेस – १५० रुपये
अवजड वाहने – १९० रुपये