राऊतांचा पाय आणखी खोलात; संजय राऊतांविरूद्ध शिवडी कोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट जारी

    07-Jan-2023
Total Views | 47



राऊतांचा पाय आणखी खोलात; संजय राऊतांविरूद्ध शिवडी कोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट जारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढल आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे.

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी १०२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र जामीन रद्द झालेला नाही.

‘वॉरंट’ रद्द झाल्याने राऊतांना दिलासा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात वारंवार गैरहजर राहणारे खासदार संजय राऊत शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र ‘वॉरंट’ जारी केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच राऊत हजर झाल्याने त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र ‘वॉरंट’ दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी ‘वॉरंट’ रद्दबातल केले. मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे ’वॉरंट’ बजावले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४ जानेवारीला होणार आहे.
 
१०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. शिवडी महानगरदंडाधिकार्‍यांकडे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरेंट बजावले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि ..

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर बुलडोझर तर आसिफ शेखचं घर स्फोटात बेचिराख, सुरक्षा दलाची कारवाई!

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर बुलडोझर तर आसिफ शेखचं घर स्फोटात बेचिराख, सुरक्षा दलाची कारवाई!

(Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121