'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रचे राज्यगीत म्हणून घोषीत झाले आहे. हे गीत राज्यगीत झाल्याची घोषणा सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक आणि ऊर्जा देणारे गीत म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, अशी गर्जना करणारे शाहिरी परंपरा जपणारे शाहीर कृष्णराव साबळे यांना आपण शाहीर साबळे या नावाने ओळखतो. यांचा जन्म वारकरी असणाऱ्या गणापत साबळे यांच्या कुटुंबात ३ सप्टेंबर १९२३ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे वडील भजनात अभंग गायचे व आई घरात दळण दळताना ओव्या म्हणायची. कदाचित आई - वडीलांकडूनच संगीताच बाळकडू शाहीर साबळे यांना मिळाल. लहाणपणीच बासरी वाजवण्याचे वेड त्यांना लागले होते.
शिक्षण :
प्राथमिक शिक्षण जन्मस्थानी आटोपुन अंमळेनरच्या मामाकडे ७ वी पर्यतचे शिक्षण घेण्यासाठी ते गेले. आणि मग त्यानंतर त्यांनी शाळेला राम राम ठोकला. तिथून साने गुरुजी यांच्या संपर्कात येउन स्वातंत्र्य साम्राज्याच्या काळात साने गुरुजी यांच्या सह बराच वेळ त्यांनी एकत्रीत घालवला. त्यांच्या मनात सामाजिक बांधीलकीची जाणीवही निर्माण झाली. अम्मळनेर मध्येच त्यांनी शाहीर मंडळांची स्थापना केली. याच गावात त्यांचा गाडगेबाबांशीही संपर्क आला. विविध उत्सवांमधून उत्कृष्ट भजने आणि गाणी ते स्वत:गात असून, १९६० साली यमराज्यात एक राज्य या नाटकात त्यांनी पहील्यांदाच काम केल.
कालांतराने ते लिलाबाई मांजरेकर यांच्या तमाशा फडात ते सामील झाले. १९४२ मध्ये तमाशा सोडून त्यांनी स्वदेशी मील मध्ये काही काळ नौकरी देखील केली. पण त्यांचे मन नौकरीत रमले नाही. अनेक राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या साबळे यांनी शाहीर साबळे व पार्टीचे स्थापना केली ती साने गुरुजी यांच्या आशीर्वादाने.
याच काळात त्यांच्या कार्याचा बोलाबोला अवघ्या महाराष्ट्रभर होत होता. आकाशवाणीत गाण्याची संधी मिळत असतानाच याच काळात त्यांना ध्वनी मुद्रिकेत पहील्यांदाच गाण्याची संधी मिळाली, ते गाणं होत नवलाईचा इंदु स्तान, इतकच नव्हे तर ते दारु बंदक प्रचारक म्हणून परत साताऱ्यात आले. इथ त्यांना कर्मवीर भाऊ राव पाटील यांचा सह्भाग लाभला. कुटुंबात त्यांना पत्नी भानूमतिची साथ नेहमीच मिळत असे. ती स्वत : गीत लिहीत व साबळे त्या गाण्यांना चाली लावत. याचवेळी त्यांना आकाशवाणी प्राथमिक संगीत विभागात काम करण्याची संधी चालून आली. यावेळी आचार्य अत्रे, पं. जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांच्याकडून शाहीर साबळे यांच्यावर कौतुकाची थाप नेहमीच पडत असे.
नाटके :
आंधळ दळतंय, बापाचा बाप, अशी अनेक लोक्नाट्ये व मुक्तनाट्ये शाहीर साबळे यांनी रंगभूमीवर आणली.
त्यांनी १९९० च्या दशकात ७० व्या अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.
एच. एम. व्हीने १९५४ - ५५ शाहीर साबळे व मोहम्मद रफी यांना सर्वात यशस्वी कलाकार म्हणून गौरव केला.
पुरस्कार:
१९८४ : संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९८८ : शाहीर अमर शेख पुरस्कार
१९९० : ७० व्या अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र गौरव पुरस्कार
१९९४ : संत नामदेव पुरस्कार
१९९७ : सातारा भुषण, महाराष्ट्र राज्य आणि शाहीर बापूराव पठ्ठे पुरस्कार
१९९८ : पद्मश्री पुरस्कार
२००१ : उत्कृष्ट गायक महाराष्ट्र राज्य पुरस्कार
२००२ : पं. सावळाराम, शाहीर फारंडे
२००५ : महाराष्ट्र भुषण
२००६ : महाराष्ट्र रत्न पुरस्कार
२०१२: लोकशाहीर विट्ठल उमाप मृदगंध जीवनगौरव पुरस्कार
साबळे यांच्या मुंबावतीची लावणी, आधुनिक मानवाची कहाणी, यांसारख्या अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी लाभत असतानाच त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची स्थापना केली.
अभंग, लावणी, पोवाडा, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, मंगळागौर, घ्या मुरळी, वासुदेव धनगर या सगळ्याच गोष्टीचा सुखद अनुभव घेण्यासाठी रसिकांनी गर्दी केली.
आत्ताचे प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी व त्यांचा नातू केदार शिंदे, यांसारख्या कलाकारांनी त्यावेळच्या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम अवघ्या भारतभर केला.
हे पहिले दिग्गज असे आहेत की, ज्यांनी पथनाट्याला रंगभूमीवर आणलं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यत शाहिरी परंपरा जपली तसेच त्यांचा मुलगा देवदत्त साबळे प्रसिद्ध संगीतकार आणि मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
संगीतकार, गीतकार, वादक, अभिनेता, दिग्दर्षक, निर्माता अशा शाहीर साबळे यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी २० मार्च २०१५ रोजी अवघ्या राज्यासह जगाला निरोप दिला.