सृष्टीतील घटक वापरून आहे ते सौंदर्य खुलविणे व जतन करणे याचा खोल शास्त्रीय अभ्यास म्हणजेच सौंदर्यशास्त्र होय. शास्त्र हा शब्द जिथे आला तिथे विज्ञान आलेच. आयुर्वेदामध्ये विविध दिनचर्येतील विधींचा आरोग्य रक्षणार्थ सौंदर्य रक्षण व जतनार्थ उपाय म्हणून उल्लेख केलेला आहे. दिनचर्या म्हणजे रोजच्या दिनचर्येचे वर्णन म्हणजेच काय तर सौंदर्य जतन व वर्धनासाठी रोज नियमितपणे काही नियम पाळले, तर काही तक्रारी त्रास उद्भवतच नाहीत व सुदृढ स्वास्थ व सौंदर्य प्राप्त होऊन ते टिकते.
सौंदर्य हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा, जिज्ञासेचा, कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा आहे. हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाचा शब्द आहे व सौंदर्यांचे मापदंडदेखील सापेक्ष आहे. हे जरी असले, तरी ढोबळमानाने असे म्हटल्यास वावगे होणार नाही की जे मनाला आवडते, पटते, आनंद देऊन जाते ती गोष्ट वा वस्तू वा व्यक्ती सुंदर भासते आणि त्या व्यक्ती समान आपण दिसावे, राहावे असे वाटून केलेली खटपट म्हणजे सौंदर्यवर्धन होय. जसे, गोड जिन्नस जरी अनेकांना आवडत असेल, तरी तो गोड पदार्थ भिन्न असतो, चव वेगळी असते त्या मिष्टान्नाचा रंग, वास, आकार सगळ वेगळे असते. पण, गोड आवडते म्हणून सगळ्यांनाच गोड म्हटले जाते. तसेच, प्रत्येक व्यक्तीला विविध दृष्य, वस्तू, व्यक्ती सुंदर वाटू शकतात. शरीर सौंदर्याचा विचार केला, तरी प्रत्येक व्यक्तीला सुंदर वाटणारा अवयव व त्याची रचना वेगळी असते, असू शकते. काहींना लांब, सडक केस आवडत असतील, तर काहींना कुरळे केस मोहून टाकतात. काहींना सरळ टोकदार नाक, मोठे डोळे आवडतात, तर कुणाला घारे डोळे आणि त्या गोष्टी सुंदर वाटणे हे वयासापेक्ष ही बदलते. लहानपणी मोहक, आकर्षक वाटणारी व्यक्ती कालांतराने तारुण्यात आल्यावर ही आवडेलच असे नाही.
असे जरी असले तरी मनुष्याला आपल्यातील उणिवा भरून काढणे आवश्यक जेव्हा वाटते तेव्हा त्यासाठी तो प्रयत्नशील राहतो व त्यासाठी उपाययोजना करू लागतो.सुंदर दिसणे, राहणे प्रत्येकालाच हवेहवेसे वाटत असल्यामुळे त्यांच्या जतनासाठी व वर्धनासाठी तो विविध युक्त्या वापरतो, प्रसाधने, आहारीय घटक औषधोपचार सौंदर्य प्रसाधने इ. वापरतो. आयुर्वेदाने सौंदर्य जतन व वर्धन करण्यासाठी काही उपाय नियम, आहार पद्धती, उपचार पद्धती इ. सांगितल्या आहेत. त्याबद्दल आपण या सदरातून जाणून घेऊया.
प्राचीन काळापासून मनुष्याने सृष्टीतील विविध घटकांचा प्रयोग स्वतःच्या पोषणासाठी, आनंदासाठी, वाढीसाठी केला आहे. विविध प्राचीन सभ्यता व संस्कृतीमधून जगात सर्वत्र विविध उपाययोजना केल्याचे संदर्भ आहेत. इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीमध्ये ममीज (चणचचखएड) ना अधिक काळ टिकवण्यासाठी त्यावर पट्टलेपन केले जात. या पट्ट्यांना सुगंधी लेप लावले जात. ज्यामुळे कुजने, सडणे, शिळे होणे असे काही न होता फक्त त्याचे संरक्षण व संवर्धन केले जाई. ग्रीक व रोमन संस्कृतीमधूनदेखील सौंदर्य प्रसाधने व ठर्ळीींरश्रीपद्धती या खूप विस्तारीत व उत्तम प्रतिच्या होत्या. भारतीय प्राचीन संस्कृतीतूनही विविध सौंदर्य साधनांचा उल्लेख सापडतो. रामायणातून महाभारतातून तसेच कालिदासांच्या संस्कृत वाङ्मयातून तत्कालीन सौंदर्य प्रसाधने विधी इ.चा उल्लेख आढळतो.
उदा. महाभारतात अज्ञातवसात जेव्हा पांडव असतात. तेव्हा, द्रौपदी ही विराट नगरीत राहते. तिथे सुदेष्णा राणीची ती प्रधान दासी म्हणून कार्य करते. मुख्यत्वे करून प्रसाधिकेचे काम करत. (जीला सौंदर्य वर्धनार्थ विविध विधी व प्रसाधने माहीत असून त्यात निपुणता आहे, अशा स्रीला प्रसाधिक म्हटले आहे) व तिची स्वतःची एक प्रसाधक पेटिका (तरपळीूं ज्ञळीं) होती.
सृष्टीतील घटक वापरून आहे ते सौंदर्य खुलविणे व जतन करणे याचा खोल शास्त्रीय अभ्यास म्हणजेच सौंदर्यशास्त्र होय. शास्त्र हा शब्द जिथे आला तिथे विज्ञान (विशिष्ट खोल खपवशिींह ज्ञान) आलेच. (शास्त्र असतं ते!!) आयुर्वेदामध्ये विविध दिनचर्येतील विधींचा आरोग्य रक्षणार्थ सौंदर्य रक्षण व जतनार्थ उपाय म्हणून उल्लेख केलेला आहे. दिनचर्या म्हणजे रोजच्या दिनचर्येचे वर्णन म्हणजेच काय तर सौंदर्य जतन व वर्धनासाठी रोज नियमितपणे काही नियम पाळले, तर काही तक्रारी त्रास उद्भवतच नाहीत व सुदृढ स्वास्थ व सौंदर्य प्राप्त होऊन ते टिकते.
सौंदर्यासाठी विशेषत: बाह्य शारीरिक सौंदर्य म्हटले की, मुख्यत्वे करून केस व त्वचा यांचा अंतर्भाव होतो. चेहर्याची व डोक्यावरील केस या गोष्टींना हल्लीच्या शतकात अनान्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बाह्य सृष्टीशी व्यक्तीचा जो संपर्क होतो, संबंध येतो, तो मुख्यत्वे करून त्वचेमार्फतच होतो. त्वचेचे कार्य उत्तम होण्यासाठी त्याची कार्यक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे. शरीरावरील एक ही अवयव असा नाही, ज्यावर त्वचेचे आवरण नाही. त्वचेचे वजन त्या व्यक्तीच्या वजनापेक्षा एक अष्टमांश असते व रोजच्या रोज त्वचेवरील सर्वात बाह्य स्तर निघत असतो. निष्कसित होत असतो. शरीरातील प्रत्येक पेशीचे उत्पती (निर्मिती), स्थिती (कार्यरत राहणे) व लय (विनाश) होत असतो. प्रत्येक पेशीच आपले ठरावीक कार्य झाले की ते मृत होते व शरीरातून त्याचे निष्कासन केले जाते. त्याप्रमाणेच त्वचेचे ही आहे.
त्वचेचे आयुर्वेदानुसार, सात स्तर सांगितले आहेत. बाह्यत: असलेला स्तर हा मृत पेशींचा असतो व बाह्य वातावरणाशी लढण्यासाठी तसेच त्वचेतील अभ्यंतर स्तरांचे व अन्य अवयवांचे रक्षण करण्याहेतू या मृत पेशींची बाह्यत: रचना केलेली आहे. याचबरोबर त्वचेमधून स्पर्श ज्ञानही होते. त्वचा याचा शाब्दिक अर्थच झाकते ती त्वचा हा आहे. (त्वच् संवरणे)
त्वचेला चर्म हा एक समानार्थी शब्द आहे. सतत क्रियमाण असल्यामुळे चर्म हा त्याचा समानार्थी शब्द आहे. (आतील स्तरातून सर्वात बाह्यत: स्तरापर्यंत येणे ही या त्वचेतील पेशींचे अव्याहत चाललेले कार्य असते.) या सात स्तरांची रचना भिन्न-भिन्न आहे व त्यात होणारे आजारही वेगवेगळे आहेत. त्यांची जाडीदेखील वेगळी आहे. त्वचा जसे बाह्य वातावरणापासून, प्रदूषण, ऊन-पाऊस-वारा इ.पासून शरीराचे रक्षण करते.(आभ्यंतर शरीराचे) त्याचप्रमाणे शरीरातील अभ्यंतरन : असलेल्या जलीयांशाचे ही अतिरिक्त निष्कासन/ बाष्पीकरण आटोक्यात ठेवते, नियंत्रित ठेवते.
याचबरोबर त्वचेतील रंजक घटकांमुळे सूर्य तापाने त्वचा भाजणे, जळणे, काळवंडणे चटकन होत नाही. प्रदीर्घ काळ उन्हात राहिल्यावर र्डीप ींरप होऊ शकते/होते. म्हणजे प्राथमिक संरक्षण हे त्वचेचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. त्वचेमुळे व्याधिक्षमत्व ही उत्तम राहते ते कसे? तर विविध जैविक-रासायनिक-भौतिक घटकांचा शरीराच्या आत मज्जाव त्वचेमार्फत होतो. जेवढी त्वचा सक्षम तेवढे व्याधिक्षमत्व उत्तम त्वचेमार्फतच त्वचेचे तापमान, स्निग्धता, आर्द्रता नियंत्रित राखली जाते. त्वचेतील रोमरंध्रांतून घाम उत्सर्जित होतो. या घामामध्ये थोडा जलीयांश व थोडा स्निग्धांश असतो. या रोमरंध्रांतून घाम बाह्य स्तरावर येतो व त्वचेला तापण्यापासून, कोरडेपणापासून वाचवते. तसेच, बाह्य जीवाणूंना शरीरात चटकन प्रवेश मिळत नाही. हा घाम त्वचेवरील बाह्य जीवाणूंना त्वचेवर टिकू देत नाही, त्यांची वाढ होऊ देत नाही.
त्वचा फक्त उन्हापासूनच आपले संरक्षण करत नसते, तर पावसापासून व थंडीपासून आभ्यंतर अवयवांचे व शरीराचे ही संरक्षण करते. त्वचेतून घाम निघाल्यामुळे त्वचा उन्हाळ्यात अधिक न तापता थंड होऊ लागते व थंडीत रोमरंध्रबंद होऊन शरीरातील आतील उष्णता आतच अडकवली जाते अडकवा केला जातो. त्वचेच्या अन्य कार्यांबद्दल पुढील लेखात जाणून घेऊयात. (क्रमश:)
-वैद्य कीर्ती देव