वर्ध्यात साहित्य संमेलनाची धामधूम

    30-Jan-2023
Total Views | 142
मुंबई : दि. ३ फेब्रुवारीपासून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात होत आहे. यावर्षी हे संमेलन वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आलेले आहे. ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या ३ दिवशीय साहित्य संमेलनासाठी साहित्त्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत.

sahitya sammelan 
 
संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. विशवनाथप्रकाश तिवारी व हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास उपस्थित असतील. विशेष अतिथी आ. डॉ. विश्व्जीत कदम, डॉ. पी. डी. पाटील व्यासपीठावर उपस्थित असतील. माजी खासदार दत्ता मेघे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील तर संमेलनाचे मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लाभले आहेत.
 
स्वावलंबी शाळेच्या मैदानावर २ सभामंडपांमध्ये कार्यक्रम पार पडणार आहेत. आचार्य विनोबा भावे सभामंडपात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्य कार्यक्रम तसेच उदघाटन सोहळा पार पडत आहे. तर मनोहर म्हैसाळकर सभामंडपात सहकारमहर्षी बापूरावजी देशमुख व्यासपीठावर विविध चर्चासत्रे व परिसंवाद होणार आहेत.
 
 
संमेलनपूर्व कार्यक्रम
 
■ बुधवार, दि. १ फेब्रुवारी २०२३
सायं. ६.३० वा. श्री सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजन
 
■ गुरुवार, दि. २ फेब्रुवारी २०१३
दु. ४.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शन व ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाचे उद्घाटन
उद्घाटक : श्री. भारत सासणे, मावळते संमेलनाध्यक्ष
सायं. ६.३० वा. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज विरचित सामुदायिक प्रार्थना : प्रकाश महाराज वाघ खंजिरी भजन: भाऊसाहेब थुटे
 
■ शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी
स. ८.०० वा. ग्रंथदिंडी मार्ग म. गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, झाशी राणी चौक, जेल रोड, शिवाजी महाराज चौक, आर्वी नाका चौक, बॅचलर रोड, पावडे चौक मार्गे संमेलन स्थळ
स. १०.१० वा. वर्धा गौरवगीत गीतकार : संजय इंगळे तिगावकर
सादरकर्ते : अजय हेडाऊ व गायक-वादक कलावंत
स. १०.२० वा. ध्वजारोहण हस्ते : प्रा. उषा तांबे, अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
 
 
पहिल्या दिवशीचे कार्यक्रम
■ आचार्य विनोबा भावे सभामंडप (प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ)
- परिसंवाद : कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा
- परिसंवाद : आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे
- परिसंवाद : ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता
- निमंत्रितांचे कविसंमेलन
मनोहर म्हैसाळकर सभामंडप (सहकारमहर्षी बाबुरावजी देशमुख व्यासपीठ)
- कथाकथन
- परिचर्चा : संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर चर्चा
- परिसंवाद : विदर्भातील बोली-भाषा
विशेष कार्यक्रम : मृदगंध वैदर्भीय कार्यप्रतिभा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121