वसई की महाबळेश्वर; ‘सेवा विवेक प्रकल्पा’वर तरुण शेतकर्‍याद्वारे स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग

    28-Jan-2023
Total Views | 93
 
राकेश अधिकारी
 
खानिवडे : वसई तालुक्यातील ‘सेवा विवेक प्रकल्पा’वर प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरी शेतीमुळे हे वसई आहे की, महाबळेश्वर असा आभास निर्माण होत आहे, तर आमच्या भागात स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते म्हणून प्रायोगिक शेती पाहण्यास आलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .
 
पालघर जिल्ह्यातही स्ट्रॉबेरी पीक घेता येऊ शकते, हे प्रायोगिक लागवडीतून सिद्ध होत आहे आणि तसा प्रयोग करून वसई तालुक्याच्या ‘सेवा विवेक प्रकल्पा’वर तरुण शेतकरी राकेश अधिकारी यांनी स्ट्रॉबेरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे.
‘सेवा विवेक प्रकल्पा’वर विविध भाज्या, फळभाज्या, तांदूळ, बाजरी, मका, कलिंगड, राई यांची शेती केली जाते. पण या वर्षी पहिल्यांदाच स्ट्रॉबेरी लावण्याचा प्रयोग ‘सेवा विवेक’ प्रकल्पावर दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आला. तो यशस्वी होत स्ट्रॉबेरीचे पीक त्यांच्या हाती लागले आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतामुळे निसर्गरम्य विविध सेवा प्रकल्प अजून फुलून उठला आहे.
 
प्रकल्पावर भेट देणार्‍या विविध पर्यटकांना, पाहुण्यांना स्ट्रॉबेरीचे शेती पाहून आश्चर्य व कुतुहल वाटत आहे. आधीच पडलेला गारवा आणि समोर लालेलाल आणि हिरवा असे स्ट्रॉबेरीचे शेत त्यामुळेच काही जणांना महाबळेश्वरला आलोय असे वाटते. सध्या या भागात स्ट्रॉबेरी शेतीची चर्चा असून वसईत ही स्ट्रॉबेरी होऊ शकते, हे सिद्ध करण्यात ‘सेवा विवेक प्रकल्प’ यशस्वी झाला आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत अनेक शेती प्रयोग करण्यात आले असून कमी खर्च आणि कमी मनुष्यबळाद्वारे पारंपरिक भात लागवडीला पर्याय म्हणून ‘मल्चिंग’ शेती, ‘एसआरटी’ पद्धत, चार सूत्री, ‘ड्रम सिडर’, ‘एसआरआय’ आणि यांत्रिक पद्धत अशी लागवड करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
 
यशस्वी लागवड केलेली स्ट्रॉबेरी शेती ही ‘मल्चिंग’ पद्धतीने केली आहे. ही शेती पाहण्यासाठी आता शेतकरीही धाव घेत असून नकदी व जास्त उत्पन्न देणार्‍या स्ट्रॉबेरीची लागवड आम्हीही करणार, असा निर्धार बोलून दाखवत आहेत. तर वसईत स्ट्रॉबेरी पिकली, तर मुंबईला जास्त मागणी असलेली टवटवीत लालबुंद चविष्ट स्ट्रॉबेरी ताज्या स्थितीत मिळेल आणि उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक सक्षम करणारी स्ट्रॉबेरी शेती उन्नतीकडे घेऊन जाईल, असा मनोदय ‘सेवा विवेक’मार्फत करण्यात येत आहे . ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील वनवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने काम करत असून जिल्ह्यातील शेकडोहून अधिक महिलांना बांबू, हस्तकला प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
 
लागवड केलेली जात
स्ट्रॉबेरी व्हरायटी - स्वीट सेन्सशन
लागवड - दि. 16 नोव्हेंबर 2022
लागवड पद्धत - सेंद्रीय शेती, मल्चिंग पेपर, अणि ठिबक सिंचन
1000 स्ट्रॉबेरी रोप लागवड (प्रति रोप 13 रुपये) चार गुंठे क्षेत्र जमिनीचा वापर.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121