- जामिया मिलिया आणि जेएनयूमध्ये माहितीपटासाठी डावे आग्रही
25-Jan-2023
Total Views | 86
11
- बीबीसीच्या भारतविरोधी माहितीपटास करणाऱ्या अनिल अँटोनी यांनी काँग्रेस सोडली
- माहितीपटास विरोध न करण्याचा काँग्रेसचा होता दबाव
- जामिया मिलिया आणि जेएनयूमध्ये माहितीपटासाठी डावे आग्रही
नवी दिल्ली : बीबीसीच्या भारतविरोधी माहितीपटास विरोध करणारे केरळ काँग्रेसचे नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी दिली आहे. बीबीसी माहितीपटास विरोध करणारे ट्विट डिलीट करावे, या काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करणारा माहितीपट तयार केला आहे. त्याविरोधात भारतासह ब्रिटनमध्येही संताप व्यक्त करण्यात येत असून ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील त्या माहितीपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी भारतात मात्र काँग्रेस आणि डावे पक्ष त्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले आहे.
संबंधित बातमी :
25 January, 2023 | 17:46
काँग्रेस पक्ष बीबीसीच्या माहितीपटाचे समर्थन करत असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र आणि केरळ काँग्रेसमध्ये पदाधिकारी असलेले अनिल अँटोनी यांनी काँग्रेसच्या या धोरणाचा निषेध म्हणून राजीनामा दिला आहे. यावेळी ते म्हणाले, ब्रिटीश ब्रॉडकास्टर्स आणि यूकेचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचे समर्थन करणे हे भारतासाठी अतिशय़ धोकादायक आहे. भाजपसोबत मतभेद असले तरी ते देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या कृत्याचे समर्थन करता येणार नसल्याचे अनिल अँटोनी यांनी ट्विटद्वारे म्हटले होते.
अँटोनी यांच्या या ट्विटमुळे काँग्रेस नेतृत्व संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी अँटोनी यांना ट्विट काढून टाकण्याचा आदेश दिला. मात्र, अँटोनी यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला. त्या दबावास कंटाळून अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
राजीनाम्याविषयी बोलताना अँटोनी म्हणाले, जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करत होते; त्यांनीच माझ्यावर असहिष्णुपणे ट्विट डिलीट करण्याचा दबाव टाकला होता. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. त्याचप्रमाणे काँग्रेस नेतृत्वास केवळ लाळघोटेपणा करणाऱ्यासोबतच काम करण्यात रस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असाही टोला त्यांनी लगाविला आहे.
बीबीसी माहितीपट प्रसारणाविषय़ी जेएनयूमध्ये गोंधळानंतर जामिया मिलिया इस्लामिया येथे चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. विद्यापीठात या खोट्या माहितीपटाचे प्रसारण करण्याचा प्रयत्न डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी केला. त्यास राष्ट्रवादी विचारसरणीच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांवी विरोध केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.