मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंच्या १९बंगल्यांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे आणि वायकर परिवार यांचा विरोधात, ग्रामपंचायतीची नोंद खोटी, फोर्जरी करणे बेकायदेशीर कृत्ये करणे. म्हणून भादंवि ’४१५’, ‘४२०’, ’४६७’, ‘४६८’, ’४७१’ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
रश्मी उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रे देत आहोत. आम्हाला आतापर्यंत हे बंगले तिथे आहेत, असे सांगण्यात येत होते. लेखी उत्तरे सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर बंगले नाहीत.’ असे सांगण्यात येत आहे. सदर जागेवरील बंगल्यांचे काय झाले याची चौकशी करावी, या आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांनीही सह्या केल्या होत्या.