मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी दीपक करंदीकर

    30-Sep-2022
Total Views |
deepak karandikar
 
 
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक दीपक करंदीकर यांची मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या (MCCIA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या ८८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. २०२२-२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी दीपक अध्यक्षपद सांभाळतील. राज्यात उद्योजकता वाढीसाठी काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स सर्वांनाच सुपरिचित आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई )आपण जास्तीत जास्त काम करू असा विश्वास दीपक यांनी व्यक्त केला आहे.
 
१४ वर्षांपासून करंदीकर हे मराठा चेम्बरशी संबंधित आहे. याचबरोबरीने चेम्बरच्या एमएसएमई उद्योगांच्या समितीचे अध्यक्ष देखील होते. नॅशनल ऍग्रीकल्चर अँड फूड ऍनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिटयूट (NAFARI), ऑटो क्लस्टर डेव्हलोपमेंट अँड रिसर्च इन्स्टिटयूट (ACDRIL), MCCIA इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशन (MECF) या सर्व संस्थांच्या उभारणीत दीपक करंदीकर यांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. त्यांनी यात मोठे योगदान दिले आहे. या संस्थांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या अनेक समित्यांवर इज ऑफ डुईंग बिझनेस या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

कठोर परिश्रम, समर्पण, ईच्छाशक्ती, ध्यास आणि आत्मविश्वास या पाच गोष्टी गाठीशी असल्या की, कोणतीही गोष्ट साध्य करणं शक्य आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत जिद्दीने पुढे जात राहिलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे. घरची परिस्थिती फारच बेताची. मेंढपाळ हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. अशा परिस्थितीत बिरदेवने एक स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. यात त्याला दोनदा अपयशही आलं. मात्र, तरीसुद..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121