नवरात्री-महिला सुरक्षा

    29-Sep-2022   
Total Views |
गरबा
 
 
 
नवरात्रीचे नऊ दिवस गरब्यादरम्यान हिंदू भगिनी आणि महिला मोठ्या संख्येने रात्री घराबाहेर पडतात. त्यामुळे या काळात हिंदू महिलांची सुरक्षितता लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने गरब्याच्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्याचे धोरण यंदा राज्यात सर्वत्र लागू केले. त्यासाठी सर्वप्रथम मध्य प्रदेश सरकारचे स्वागतच करायला हवे. तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांनीही सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती, त्याचेही गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.
 
 
 
यामागील कारणंही तशी अगदी स्पष्ट आहे. बरेचदा या उत्सवाच्या रंगात हिंदू तरुणींची छेड काढण्यापासून ते त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रकार गुपचूप केले जातात. त्यातच विशेषकरून आपली धार्मिक ओळख मुद्दाम लपवून, चक्क नवरात्रीच्या गरब्यामध्ये भाग घेत, तसाच पेहराव करत काही धर्मांधांची नजर ही हिंदू तरुणींकडे असते. त्यांच्याशी गरब्यादरम्यान गोड बोलून, मोबाईल क्रमांकाची आदलाबदल केली जाते आणि मग चॅटिंग, फोटो असे करत करत याचे रुपांतर खोट्या प्रेमसंबंधांत होताना दिसते. अशाच कित्येक ‘लव्ह जिहाद’च्या घटना अलीकडच्या काळात उघडकीसही आल्या आहेत. त्यातच सध्या ‘पीएफआय’वर झालेल्या देशव्यापी कारवाईमुळे आणि बंदीमुळे या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नवरात्रीला लक्ष्य केले जाऊ शकते, अशीही एक शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे.
 
 
 
त्यामुळे गरब्याच्या ठिकाणी ओळखपत्रांशिवाय, संबंधित सोसायटीच्या सदस्यांशिवाय बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना प्रवेश नाकारणे हा सावधगिरीचा उपाय म्हणावा लागेल. त्यामुळे अशाप्रकारे खबरदारीच्या उपाययोजना करताना नवरात्रोत्सव आयोजकांनाही यासंदर्भात सरकारी आदेशाची वाट पाहण्याची मुळी गरजच नाही. गरब्याला हजेरी लावणार्यान हिंदू भगिनी आणि बांधवांची सुरक्षितता ही पालकांबरोबरच सर्वस्वी तेथील आयोजकांचीही जबाबदारी आहेच. त्यामुळे नवरात्रोत्सवात नऊ दिवस पूजाअर्चा, गरबा करून देवीचा जागर करताना, या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होणार्यात भगिनींच्या सुरक्षिततेचीही आयोजकांनी पुरेपूर काळजी घ्यायला हवी. ओळखपत्रांची सक्ती त्याचबरोबर परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, सुरक्षारक्षकांची नेमणूक, स्वयंसेवकांची दक्षता ही यादरम्यान अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे उत्सव साजरा करताना समाजविघातक शक्तींमुळे रंगाचा बेरंग होणार नाही, याचे भान महत्त्वाचे!
 
सुसंवादाला हवी ‘स्मार्ट’ संवादाची जोड
मुंबईच नव्हे, तर देशभरातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे, त्याचे गुन्ह्यांत झालेले रुपांतर याविषयीच्या बातम्या तर हल्ली नित्याच्या. त्यातच याविषयी हिंदू संघटनांकडून अलीकडच्या काळात प्रचंड जागृतीही झालेली दिसते. एवढेच नाही, तर हा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही मागील अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावरही मांडला. सोशल मीडियावरही यासंबंधी बर्यााच पोस्ट्स, व्हिडिओही आपल्याला वाचायला, पाहायला मिळतील. त्यामुळे ‘या सगळ्या घटना फक्त गावाकडे घडतात, शहरात आपल्या मुलीबरोबर असे काही घडूच शकत नाही,’ या भ्रमात पालकांना कदापि न वावरता, मुलगी कळत्या वयाची झाल्यावर तिला याविषयी योग्य ते मार्गदर्शन करणे, ही आज प्रत्येक हिंदू पालकाची नैतिक जबाबदारी म्हणावी लागेल.
 
 
फक्त या सगळ्या गोष्टी तरुणींना नेमक्या कशा समजावून सांगायच्या, याविषयी पालकांनीही तितकेच सजग राहणे गरजेचे. हल्लीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या जमान्यात अमूक एका धर्माचेच सगळे विद्यार्थी असतील, असे चित्र अभावानेच दिसून येते. खरंतर त्यात गैरही काही नाहीच म्हणा. इतर धर्माचे मित्र-मैत्रिणीच नको, अशी टोकाची भूमिका पालकांनी घेतली की ती आजच्या ‘अॅरडव्हान्सड’ पिढीच्याही ते पचनी पडणे जरा अवघडच. त्यापेक्षा मित्र-मैत्रिणी कुठल्या का जाती-धर्माची असेना, त्यांची वर्तणूक, त्यांचे विचार, त्यांची साधारण कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या पाल्याला व्यवस्थित माहिती आहे का, याची त्यांना जाणीव करून द्यावी.
 
 
तसेच, मैत्री आणि प्रेमसंबंध यातील योग्य ‘अंतर’ पालकांनी आपल्या पाल्याला हसतखेळत, मित्रत्वाच्या, सुसंवादाच्या माध्यमातून आक्रस्ताळेपणा न करता समजावून सांगणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल. बरेचदा पौगंडा अवस्थेतील मुलामुलींना बरे-वाईट, नैतिक-अनैतिक याची पुरेशी समज नसते. ‘पिअर प्रेशर’च्या नादी लागून ते बरेचदा वाहवतही जातात. त्यामुळे मोबाईल असेल अथवा मित्रमंडळी, आपल्या पाल्याचा जगाकडे बघण्याचा एकंदरच दृष्टिकोन विकसित करण्याकडे पालकांनी पद्धतशीरपणे लक्ष द्यायला हवे. शाळा, महाविद्यालये त्यांच्या पातळीवर हा विषय हाताळतील किंवा नाही, पण पालक म्हणून भोचकपणे, संशयी दृष्टिकोनातून नव्हे तर ‘स्मार्ट’ संवादातून, पाल्याशी मित्रत्वाचे धागे गुंफून, त्यांच्या कलाने विचार केल्यास हा भावनिक गुंता नक्कीच सुटू शकतो, एवढेच!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची