हेच का केजरीवालांचं 'वर्ल्ड क्लास हेल्थ मॉडेल'? : महिलेची प्रसुती जमिनीवर!

    29-Sep-2022
Total Views | 67

news 1



 
 
   
 
पठाणकोट : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नेहमीच आपणच गरिबांचे उद्धारक आहोत अशा थाटात बोलत असतात. मात्र आपचे सरकार असलेल्या पंजाबमधील पठाणकोट येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी घडली. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आपत्कालीन स्थितीत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता रेफर केले. त्यामुळे महिलेची प्रकृती खालावली. अखेर दोन तासांच्या मनस्तापानंतर सदर महिलेने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिला.
 
 
 
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर लोक सिव्हिल हॉस्पिटल व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती खालावल्याने पतीने सदर महिलेस सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गैरवर्तन करून रुग्णालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत ते नाकारले.
 
 
 
व्हिडीओमध्ये सदर महिला वेदनेच्या अवस्थेत दिसत असून पती तिला अॅडमिट करण्याची विनंती करताना दिसत आहे. खासगी रुग्णवाहिका चालकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. महिलेने मुलाला जन्म दिला आणि आई आणि मूल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर दाखल झालेले रुग्ण व नातेवाईक तेथे जमा झाले. प्रकरण तापत असल्याचे पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांनाही दाखल केले.
 
 
 
उपचारांना नकार दिला नाही: SMO यांचे स्पष्टीकरण

 
एसएमओ डॉ सुनील चंद सांगतात की, रात्री उशिरा हे जोडपे आले तेव्हा त्यांच्याकडे महिलेचे कोणतेही कागदपत्र नव्हते. महिलेची कोणतीही चाचणी किंवा अल्ट्रासाऊंड करण्यात आले नाही. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला टेस्ट आणि अल्ट्रासाऊंड करून घ्या, असं सांगितल्यावर तो संतापला. त्याला अधिकृतपणे मोफत चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड करण्यास सांगण्यात आले. चाचणीशिवाय प्रसूती करता येत नाही.



प्रसूतीनंतर कर्मचार्यांलनी मानवतेच्या आधारावर दोघांना दाखल करून उपचार केले, मात्र हे जोडपे सकाळीच त्यांना न सांगता निघून गेले. पण एखाद्या महिलेला हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जन्म द्यावा लागण हे अत्यंत निंदनिय आहे. त्यात  नेहमी गरिबांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकारमध्ये असा प्रकार घडल्याने केजरीवाल यांच्या विकासाचे मॉडेल फसवे आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
 
 


 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121