‘लोकनेता ते विश्वनेता’ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन होणार

दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार कार्यक्रम

    23-Sep-2022
Total Views | 92

Modi  1


पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा प्रथमच मराठीत
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची सखोल माहिती देणाऱ्या साप्ताहिक ‘विवेक’तर्फे निर्मित ‘लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथाचे प्रकाशन देशाची राजधानी दिल्ली येथे २७ सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
साप्ताहिक ‘विवेक’तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या आठ वर्षांच्या परराष्ट्र धोरणाचा सविस्तर आढावा घेणाऱ्या ‘लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथाचे प्रकाशन दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये येत्या २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास बडवे उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
 
 
पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा सखोल आढावा प्रथमच मराठीत
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या परराष्ट्र धोरणास नवी दिशा दिली आहे. जागतिक संघर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरी महत्वाची ठरत आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वच देश भारताकडे आज नव्या आशेने पाहत आहेत, त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष धोरणाचा वाटा आहे. या सर्व घटनांचा सखोल आढावा प्रस्तुत ग्रंथात घेण्यात आला आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचा ग्रंथ प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.
 
 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121