हिंदू पक्षाची वाराणसी न्यायालयात मागणी
पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी
23-Sep-2022
Total Views | 47
नवी दिल्ली: ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्यात यावी, असा विनंती अर्ज हिंदू पक्षाकडून वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरण पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
श्रृंगारगौरी-ज्ञानवापीप्रकरणी मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळल्यानंतर उपासनेच्या हक्काची मागणी करणार्या हिंदू महिलांच्या मुख्य याचिकेवर सुनावणीस प्रारंभ झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली.
यावेळी प्रकरणाची सुनावणी आठ आठवडे पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती मुस्लीम पक्षातर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने मुस्लीम पक्षाची विनंती फेटाळून लावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी न्यायालयने 29 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.