पत्राचाळ प्रकरणात मी चौकशीला तयार : पवार

शरद पवारांना गोवण्याचा डाव : जितेंद्र आव्हाड

    21-Sep-2022
Total Views | 98

pawar



मुंबई Patra chwal case 
: २००६ ते २००७ दरम्यान या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात ’म्हाडा’चे काही अधिकारी, तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारदेखील उपस्थित होते, असे स्पष्टपणे ‘ईडी’ने आरोप पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणी शरद पवार आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. "शरद पवारांनी यापूर्वी बऱ्याच प्रकल्पांसाठी मध्यस्ती करण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. त्यात गैर काहीच नाही.". अशी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली. पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करत होते. मात्र, संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचे ‘ईडी’ने आरोपपत्रात म्हटले आहे. याला उत्तर देताना शक्य तितक्या लवकर चौकशी करा यातून सत्य बाहेर येईल, असे आव्हान शरद पवार यांनी केले. Patra chwal case

२००६-0७च्या दरम्यान शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री होते. तसेच २००७ मध्ये विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दोघांचीही नावे ‘ईडी’च्या ‘चार्जशीट’मध्ये आहेत. तसेच, शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान या सगळ्यामध्ये कसे आले, हे समोर आले आहे. ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील ‘मास्टरमाईंड’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘ईडी’ने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने ‘मनीलॉण्ड्रिंग’ केले आहे. 



प्रवीण राऊत यांच्याकडे महत्त्वाचे अधिकार दिले गेले

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते, तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. ‘म्हाडा’सोबत वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी ‘म्हाडा’मध्ये काम करणार्‍या बहुतांश सरकारी अधिकार्‍यांशी विविध फायदे आणि लाभ मिळवण्याच्या हेतूने संपर्क साधला. त्यानंतर ‘एफएसआय’ बिल्डरला विकला, असे आरोपपत्रात म्हटलेले आहे. Patra chwal case 
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत


प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनतमत होते, असेही ‘ईडी’ने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले होते. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प 740 कोटींचा असून त्यात प्रवीण राऊत यांना १८० कोटी मिळाले आहेत, असे प्रवीण राऊत यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. याचा आधार घेत संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले, असाही अंदाज ‘ईडी’ने व्यक्त केला आहे.पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणातील शरद पवारांच्या सहभागाची चौकशी करावी : आ. अतुल भातखळकरमराठी माणसाला बेदखल करण्याच्या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर काय संबंध होता, याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. Patra chwal case 

अतुल भातखळकर म्हणाले की, “मराठी माणसाला बेघर करणार्‍या ‘गुरुआशिष’ कंपनीला पत्राचाळीचा प्रोजेक्ट देण्यामध्ये राज्याचे जाणते राजे, शहेनशहा शरद पवार यांचाही सहभाग होता. हे ‘ईडी’ने पुराव्यानिशी ‘चार्जशीट’मध्ये दाखवून दिले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वाय. बी. चव्हाण सेंटर’मध्ये बैठक होत होती. त्यात संजय राऊत असतात आणि मग ‘गुरुआशिष’ कंपनीला या कामाचे कंत्राट मिळते. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून मी मागणी केली आहे. मुंबईतील मराठी माणसाला बेघर करणार्‍या संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री यांचा काय सहभाग आहे किंवा नाही, याची चौकशी करावी. हे तेच शरद पवार आहेत, ज्यांनी विजय मल्ल्याला कर्ज देण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट करून दिली होती,” असा आरोपही भातखळकर यांनी केला. Patra chwal case

भातखळकर यांनी यासंबंधीचे पत्रकही काढले. यात ते म्हणाले की, “यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, ‘म्हाडा’ जरी प्राधिकरण असले, तरी ’म्हाडा’ अधिकार्‍यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत. मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी,” अशी मागणी भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121