"भारताचा आर्थिक वाढीचा दर ७ टक्के होणार"

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांचा मोठा दावा

    21-Sep-2022
Total Views | 51

anant
 
नवी दिल्ली :संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे वातावरण तयार झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. २०२३ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ७ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. याहीपलीकडे जाऊन आपण ८ टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर गाठू असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. या एवढ्या विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे.
 
 
ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमात नागेश्वरन बोलत होते. भारत सरकारने आपल्या २०२२च्या आर्थिक सर्वेक्षणात २०२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर हा ८ टक्के असणार असल्याचे सांगितले होते. रिझर्व्ह बँकेनेही भारताचा आर्थिक वृद्धिदर ७.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या प्रभावातून मुक्त होत असल्याचे हा विकासदर निदर्शक आहे असे नागेश्वरन यांनी म्हटले आहे. याचबरोबरीने रशिया - युक्रेन युद्ध, जागतिक महागाई यासगळ्या प्रतिकूल जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम होत नसल्याचेच हे निदर्शक आहे. असे मोठे दावे नागेश्वरन यांनी केले आहेत.
 
 
भारत सरकार आर्थिक विकासात आर्थिक समावेशकता हेच मुख्य धोरण ठेवून काम करत आहे. अर्थव्यवस्थेतील आतापर्यंत वंचित राहिलेल्या वर्गापर्यंत या आर्थिक वृद्धीचे फायदे पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारतात आर्थिक व्यवहारांच्या सुलभतेच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक लवकरच आपले डिजिटल चलन बाजारात आणेल. असाही विश्वास नागेश्वरन यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121