प्रशासनाने सुरक्षा देतानाच हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करावी!

भारतीय दूतावासाची इंग्लंड सरकारकडे मागणी

    20-Sep-2022
Total Views | 30
 
england
 
 
 
लंडन: इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात मुस्लिमांनी केलेल्या हिंदूविरोधी हिंसाचाराचा भारतीय दूतावासाने कठोर शब्दांत निषेध केला आहे. लंडनस्थित भारतीय दूतावासाने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले की, “आम्ही लिसेस्टरमध्ये भारतीय समुदायाविरोधातील हिंसाचार, हिंदू परिसर आणि प्रतीकांना हानी पोहोचवल्याचा कठोर निषेध करतो. आम्ही युनायटेड किंग्डमच्या प्रशासनासमोर हा मुद्दा मजबुतीने उपस्थित केला आहे. सोबतच या हल्ल्यांत सहभागी घेतलेल्यांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.”
 
 
लंडनस्थित भारतीय दूतावासाने तेथील सरकारकडे हिंसाचार पीडित लोकांना तत्काळ सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीदेखील मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेत आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. दंगल भडकू नये म्हणून असे केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेतील एका सामन्यानंतर इथे हिंसाचार भडकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदू समुदायाला लक्ष्य करण्यात आले. मुस्लीम जमावाने मंदिरे आणि ॐ लिहिलेल्या भगव्या ध्वजालाही नुकसान पोहोचवले.
 
 
लिसेस्टरच्या महापौरांनी यासाठी समाजमाध्यमांत चालेल्या दुष्प्रचाराला या संपूर्ण हिंसाचारासाठी जबाबदार ठरवले आहे. हिंदूंनी मशिदीवर हल्ला केल्याची आणि मुस्लीम तरुणीच्या अपहरणाची खोटी अफवा धर्मांध मुस्लिमांनी त्याआधी पसरवली होती. शहरातील बेलग्रेव्ह रोडच्या दिशेने येणार्‍या मुस्लीम जमावाला पोलिसांनी थांबवले आहे. महापौरांनी दावा केला की, समाजमाध्यमांत या घटनेचे वेगळेच चित्र सादर केले जात आहे. त्यांनी दावा केल की, लिसेस्टर शांततावादी शहर असून इथे बर्मिंगहमपासून अशांतता माजवण्यासाठी लोकांना बोलावले जात आहे.
 
 
दरम्यान, ‘ईस्ट मिडलॅण्ड्स’च्या शहरात झालेल्या हिंसाचाराबाबत स्थानिकांनी याआधी असे कधीही झाले नाही, असे म्हटले आहे. अधिकार्‍यांनीदेखील कोणत्याही मशिदीवर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, तेथील डावी माध्यमे जय श्रीरामांच्या जयघोषाला हिंसक ठरवत इस्लामी कट्टरपंथीयांचा बचाव करत आहे. ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने तर तेथील घटनेचे वृत्त प्रकाशित करताना नरेंद्र मोदी आणि ध्रुवीकरणाचा मुद्दाही छापला. मात्र, अनेक ध्वनिचित्रफितींमध्ये हिंदूंविरोधात मुस्लिमांनी हिंसाचार पसरवल्याचे उघड उघड दिसत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121