Leopard: नाशिकहून आलेल्या ३ बिबट्यांपैकी २ पिल्लांचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पशुवैद्यकाची वानवा

    20-Sep-2022
Total Views | 122
Leopard 1
 
 
मुंबई (Leopard): नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याच्या तीन पिल्लांपैकी २ पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही पिल्ले जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले होते. या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश होता. गेल्या पाच महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक प्राण्यांचा मृत्यू जाहला आहे.
 
'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेकडून या पिल्लांची तपसणी करून त्यांना राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव केंद्रात पाठवण्यात आले होते. जून महिन्यात या पिल्लांची परिस्थिती निरोगी होती. (Leopard) मात्र, जसे दिवस पुढे गेले त्यांची परिस्थिती खालावण्यास सुरुवात झाली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने ही वेळ आली आहे. योग्य पोषक तत्वे मिळाली नसल्यामुळे या पिल्लांची हाडे ठिसूळ झाली होती. तसेच त्यांना पचन रोग देखील झाले होते. या पैकी एका पिल्लाचा नर पिल्लाचा मृत्यू दि. १० ऑगस्ट रोजी झाला. या पिल्लांची (Leopard) प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याला दि. १८ ऑगस्ट रोजी पाठवण्यात आले. पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव केंद्रात या पिल्लांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान या पिल्लांचे पाय, पंजे 'फ्रॅकचर' असल्याचे आढळून आले. त्यांच्या रक्तात कॅल्शियम आणि 'विटामिन डी'चा अभाव दिसून आला. हा रोग अनुवांशिक असल्याचे देखील या वेळी समोर आले. उरलेल्या दोन मादी पिल्लांपैकी, एका पिल्लाचा मृत्यू दि. १४ सप्टेंबर रोजी झाला. उर्वरित तिसरे पिल्लू देखील आजारग्रस्त आहे. परंतु, या पिल्लावर शेवट पर्यंत उपचार करण्यात येणार आहेत.
 
अनेक प्राणी उपचाराच्या प्रतीक्षेत
बंदिस्त वाघांपैकी बिजली नावाची वाघीण कर्करोगाचा सामना करीत आहे. तर, रवींद्र नावाच्या वाघाला आर्थरायटीस रोग झाला आहे. तौक्ते वादळामुळे विस्थापित झालेली गिधाडे देखील अपुऱ्या उपचारामुळे त्रस्त आहेत. तर, साताऱ्याहून आलेल्या वाघाटीच्या मृत्यूची चौकशी अद्याप झालेली नाही. उद्यानातील वाघ, सिंह, बिबटे (Leopard) तसेच इतर प्राण्यांच्या रोजच्या देखरेखीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय उपलब्ध नाही. अशातच राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असून ते गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळापासून भरण्यात आलेले नाही. लवकरच हे पद भरण्यात येईल असे सांगण्यात येते, परंतु कारवाई होताना दिसत नाही.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121