"रझाकारांसोबत सजाकारांचाही बंदोबस्त करणार!"

राज ठाकरेंचा पत्राद्वारे सणसणीत इशारा

    18-Sep-2022
Total Views |
 
raj
 
मुंबई : “मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या बाबतीत जनतेत अनभिज्ञता आहे. महाराष्ट्रात ‘रझाकारांचे` लांगूलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार होते. त्यामुळे याविषयी फारसे बोलले गेले नाही. पण रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन यालाच विरोध करतेस, ही दुर्दैवी बाब आहे. गेली कित्येक वर्षे संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लुट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा`कार आहेत. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि ‘सजा`कार या दोघांचा बंदोबस्त करेलच,” असा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला. शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे गट आणि ‘एमआयएम`वर निशाणा साधला.
 
 
 
 
 
 
जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, “मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस खरे तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैदराबादच्या निजामाला हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवे होते आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्षे आधी तयारी सुरू होती. कल्पना करा की, जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे आणि म्हणून खरे तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.
 
 

लढ्याचे विस्मरण होता काम नये
 
 
मुक्तिसंग्रामाविषयी माहिती घेतल्यानंतर यातील नवनवे संदर्भ उलगडत गेले. पण एकूणच असे वाटते की, “या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसे कोणाला माहीत नाही. माझे तर म्हणणे आहे की आता जे नवे शिक्षण धोरण येत आहे, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा आणि माझे मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की, तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचे विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे,” असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121