"कुराण ईश्वरनिर्मित आहे, त्याचे पालन व्हायलाच पाहिजे"

सलमान खुर्शीद यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

    13-Sep-2022
Total Views | 231
salman
 
 

नवी दिल्ली : "कुराण हे ईश्वर निर्मीत आहे, त्यामुळे त्यामध्ये दिलेल्या सर्वच गोष्टी या पाळल्याच पाहिजेत, त्यांना नाही म्हणताच येणार नाही" असे दावे केले आहेत युपीए सरकारच्या काळाला परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेल्या सलमान खुर्शीद यांनी. कर्नाटकातील हिजाब वादावर सुरु असलेल्या सुनावणीच्या वेळी त्यांनी हे दवे केले आहेत. हिजाब घालण्याचा नियम कुराण मध्येच सांगितला आहे आणि कुराणमध्ये सांगितलेले सर्वच ईश्वराचा संदेश आहे त्यामुळे त्याचे पालन व्हायलाच हवे असेही ते पुढे म्हणाले. इस्लामध्ये कुराणाच्या आदेशाविरोधात जाताच येत नाही त्यामुळे हे करायलाच हवे असे खुर्शीद यांनी न्यायालयात सांगितले.
 
 
कर्नाटकातील हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे. न्यायाधीश सुधांशु धुलिया आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. हिजाबचे समर्थन करताना खुर्शीद यांनी हिंदू स्त्रिया घेत असलेल्या घुंगट आणि हिंदू पुरुष परिधान करत असलेली पगडी यांचे उदाहरण दिले. या सर्व हिंदू धर्मियांच्या सांस्कृतिक प्रथा आहेत असे सांगून जर यावर कुठलाही आक्षेप घेतला जात नाही तर मग एकट्या हिजाबवरच का आक्षेप घेतला जातोय असा सवाल उपस्थित केला आहे. हिजाब हा मुस्लिम महिलांचा संकसृतिक अधिकर आहे असे दावेही केले गेले.
 
 
कर्नाटकातील हिजाब वाद आता चांगलाच पेटला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलही धार्मिक वेष परिधान करून येत येणार नाही, यावर आक्षेप घेत मुस्लिम संघटनांकडून कर्नाटक उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने यावर प्रश्न उपस्थित करत एखाद्या शैक्षणिक संस्थेने गणवेश ठरवून दिला असेल आणि जर तो परिधान करण्याची सक्ती केली असेल तर तो मूकबहुत अधिकरांचा भंग कसा काय ठरतो? असा सवाल केला होता. त्यावर हिजाब हा मुस्लिम महिलांचा धार्मिक अधिकार आहे आणि न्यायालयाने धार्मिक ग्रंथांचा अर्थ लावू नये असा दावा मुस्लिम पक्षाकडून केला गेला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121