योगिता साळवी यांना वसंतराव उपाध्ये पत्रकारिता पुरस्कार!
12-Sep-2022
Total Views |
मुंबई: दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना नुकताच ज्येष्ठ पत्रकार कै. वसंतराव उपाध्ये स्मृती ‘व्यासंगी सृजनशील पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता चेंबूर हायस्कूलच्या डॉ. हेडगेवार सभागृहात होणार आहे.
योगिता साळवी यांना हा पुरस्कार ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’चे अध्यक्ष शिवनेरकर नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.