गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात दोन दिवसांत दोन नागरिकांचा बळी!

    10-Sep-2022
Total Views | 83

ta
 
मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने दोन दिवसात दोन नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे.
 
गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चराईकरिता गेलेल्या इसमास वाघाने ठार केले. ही घटना दुपारी २ च्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर आत कक्ष क्र. ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे असे या मृत इसमाचे नाव आहे.
 
त्यांनतर देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथे आणि गडचिरोली तालुक्यात एका इसमास वाघाने ठार केले. सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने गडचिरोलीत सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वाघाचे अस्तित्व असलेल्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असे वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेकजण सूचनांकडे डोळेझाक करतात. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121