आ. गोपीचंद पडळकर आणि आ. नितेश राणे प्रतीक पवार यांच्या कुटुंबीयांची नगरला जाऊन घेणार भेट
मुंबई : अहमदनगरमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या तरुणावर कट्टरवादी जमावाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रतीक पवार नावाचा तरुण गंभीर जखमी आहे. या तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत या घटनेवर संताप व्यक्त केला. तसेच, आता राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे हल्ले खपवून जाणार नाही. जशास तसेच उत्तर यापुढे दिले जाईल, असा इशारा यावेळी दिला. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत नितेश राणेंनी या घटनेची माहिती दिली.
नितेश राणे म्हणाले, आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार आहे देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. मात्र त्याच त्या विधानांना धरून जर अशापद्धतीने हल्ले होणार असतील. हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचे हात कोणी बांधले नाहीत हे मी आज सांगतो. प्रतीक पवार यांच्यासोबत आम्ही सर्व ताकदीने उभे आहोत. उमेश कोल्हे प्रकरणाची चौकशी ज्यापद्धतीने एनआयए करत आहेत. त्याच पद्धतीने या प्रकरणाचीही चौकशी एनआयएने करावी अशी मागणीही आम्ही करणार आहोत. मी स्वतः या कुटुंबीयांची लवकरच नगरमध्ये जाऊन मी भेट घेणार आहे, अशी माहिती आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणले, आज आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. एक पोलीस इन्स्पेक्टर जो या हिंदुच्या घरी जाऊन ही केस दाबण्याचा प्रयत्न करत होता. याविरोधात सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येत उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, संबंधित आरोपींवर एफआयआर घेतला गेला. मात्र आजही काही प्रमुख आरोपी फरार आहेत. त्यांनाही पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून
या घटनेची दखल मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. फडणवीस हे सातत्याने पोलीस आयजी आणि संबंधित एसपी संपर्कात आहेत. संबंधितांवर कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही. हे तुम्हाला मी यानिमित्ताने सांगतो. हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही नाहीत. त्यामुळे आता कुठेही हिंदूंना टार्गेट केलं तर जशाच तसं उत्तर आम्हालाही देता येत, असा इशाराही नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन दिला.
हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल...
तुम्ही जर आमच्या हिंदूंवर हल्ले करणार असाल, त्यांना मारण्यापर्यंत तुमची मजल जाणार असाल तर आम्हालाही हिंदूच्या आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल. कोणीही आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही
शरिया कायदा आमच्या इथे राबविणार असाल तर मुद्दाम मला गीतेतील अध्याय तुम्हाला वाचून दाखवावा लागेल. 'शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते', याचा अर्थ राष्ट्राच्या रक्षणासाठी शस्त्र उचलावे लागले तर गौण नाही आणि धर्माच्या रक्षणासाठी शश्त्राचा आधार घ्यावा असं गीतेत लिहलेलं आहे. आम्ही कोणाच्या धर्म किंवा देवी देवतांच्या विरोधात नाही. मात्र आमच्या देशाच्या रक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही नितेश राणेंनी यावेळी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.