खर्गे कुठेच नसतात ; तरी काँग्रेससाठी महत्त्वाचे का ?

ही तर काँग्रेससारख्या दरबारी पक्षाची अपरिहार्यता !

    05-Aug-2022   
Total Views | 237
 
Mallikarjun Kharge
 
 
 
मुंबई : देशात आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या पिकाला जोर आला आहे. भारतातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसकडून देशभरात महागाई आणि इतर काही मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधींसह काँग्रेसमधील बड्या राजकीय मंडळींची एका महत्त्वाच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती आणि अजूनही ती चौकशी सुरूच आहे. 'नॅशनल हेराल्ड' मधील हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात सोनिया गांधींसह अनेक मंडळी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहेत. त्यापैकी मोतीलाल व्होरा जे काँग्रेसचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते त्यांचं निधन झालंय तर इतर मंडळींवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व प्रकरणात मल्लिकार्जुन खर्गे हे महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मागील काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये खर्गेंचं वजन भलतंच वाढलेलं दिसतंय. प्रसादरमाध्यमांसमोर फारसे न दिसणारे पण काँग्रेसच्या प्रत्येक रणनीतीमध्ये मात्र असतातच हे निश्चित. खर्गे आणि काँग्रेस हे नेमकं समीकरण काय आहे याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे.
 
 
काँग्रेसने सध्या देशभरात आंदोलन सुरु केलं असून त्यात काही मोजके चेहरे नेतृत्व करताना दिसत आहेत. काँग्रेसकडून पुढे आणले गेलेले युवा नेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका वाडरा गांधी, आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि वाचाळवीरपणासाठी देशात सुप्रसिद्ध असलेले लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिरंजन चौधरी किंवा मग मल्लिकार्जुन खर्गे. या आंदोलनापूर्वी ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी बोलविण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा देखील सहभाग दिसलेला आहे. खर्गे हे कर्नाटक काँग्रेसमधलं मोठं व्यक्तिमत्त्व समजलं जात. १९७२ पासून १९७८, १९८३, १९८५, १९८९, १९९४, १९९९, २००४, २००८, २००९ या ९ विधानसभा आणि २०१४ सालची लोकसभा अशा सलग दहा निवडणूक जिंकण्याचा खर्गेंचा इतिहास आहे.
 
 
कर्नाटकाचं राजकारण जर आपण समजून घेतलं काँग्रेसला अनेक वर्षांपासून कर्नाटकात आपलं सरकार स्थापित करण्यात यश मिळालेलं आहे हे समोर येतं. २०१३ मध्ये सुद्धा जेव्हा देशभरात काँग्रेस विरोधी वातावरणाने परमोच्च बिंदू गाठला होता, तेव्हा सुद्धा २०१३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आधीच्या निवडणुकीपेक्षा चांगला परफॉर्मन्स देत निवडणूक जिंकून दाखवली. २००८ साली २२४ पैकी ११० जागांवर विजय मिळवत येडियुरप्पा यांनी कर्नाटकात भाजपचे सरकार आणून दाखवले होते. पण सरकार आणूनही अनेक प्रकरणं आणि अंतर्गत वादांमुळे २०१३ साली भाजपाला विधानसभा गमवावी लागली आणि तिथे काँग्रेसने आपला प्रभाव सिद्ध केला होता.
 
 
तेव्हाच्या या सगळ्या राजकीय धुमश्चक्रीत काँग्रेसची बाजू खंबीरपणे सांभाळण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एका बाजूला कर्नाटकात लिंगायत समाजाची मते निर्णायक असूनही खर्गे यांनी कर्नाटकात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होता. २०१३ निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यात आणि पक्षातील अंतर्गत संघर्ष बाजूला करण्यात खर्गे यांनी यश मिळवले होते. तेव्हा कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण होणार असा पेचप्रसंग निर्माण झाला आणि काँग्रेसपुढे नवीन संकट निर्माण झालं. हा पेच निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे एका बाजूला खर्गे यांनी प्रचारात मोलाची भूमिका घेत निवडणूक जिंकून देण्यात योगदान दिले होते तर दुसरीकडे काँग्रेसचे आणखी एक दिग्गज नेते असलेल्या सिद्धरामैय्या यांनी देखील मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगितला होता. अशातच कुणा एकालाही दुखावणं काँग्रेसला परवडणारं नव्हतं. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांची केंद्रीय रेल्वे मंत्री पदावर नियुक्ती करत कर्नाटकातील सत्ता संघर्षावर पडदा टाकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं चित्र निर्माण झालं आणि कर्नाटकातील सत्तासंघर्ष शाळा.
 
 
खर्गेंना इतकं महत्त्व का ?
मात्र, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि विरोधी बाकांवर बसण्याची वेळ काँग्रेसवर आली. काँग्रेसने या निवडणुकीत इतकी सुमार कामगिरी केली होती की त्यांना २०१४ मध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद देखील मिळाले नव्हते. त्यावेळी काँग्रेस आणि पर्यायाने विरोधी पक्षाचे गटनेते म्हणून खर्गे यांची निवड करण्यात आली आणि तेव्हापासूनच खर्गे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात महत्त्वाच्या भूमिकेत आले. २०१४ ते १९ मध्ये लोकसभेतील गटनेते म्हणून त्यांची कामगिरी काँग्रेसच्या दृष्टीने चांगलीच होती. मात्र, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला आणि सलग दहा निवडणूक जिंकलेले खर्गे अखेर राजकीय मैदानात पहिल्यांदा अपयशी ठरले. पण, त्यानंतरही काँग्रेसने १२ फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केली आणि १२ जून २०२१ रोजी त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते करण्यात आलं. आत्ता साधारणपणे प्रश्न असा उपस्थित होतो की खर्गे यांना खरंच इतकं महत्व का दिलं जात आहे ? तर त्याची अनेक कारणे आहेत.
 
 
त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ते पक्षाशी नाही तर गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत. कारण काँग्रेसमध्ये पक्षापेक्षा गांधी कुटुंबाला एकनिष्ठ असणार मंडळी मोठी होतात हा इतिहास आहे. दुसरं म्हणजे खर्गे सलग दहा निवडणूक जिंकलेले असल्याने त्यांना संसदीय कामाचा दांडगा अनुभव आहे, तिसरं म्हणजे ते समाजातील वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करतात. अशा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला पदावर बसवून कदाचित काँग्रेस दक्षिण भारतात पुन्हा एकदा आपलं हरवलेलं अस्तित्व स्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. केवळ कर्नाटकाचा नाही तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय घटनांमध्ये खर्गेंचा सहभाग माध्यमांमध्ये चर्चेचा विषय मानला जातो. २०१९ साली महाराष्ट्रात झालेली महाविकास आघाडीची स्थापना असो वा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग. मागील ९ वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांमध्ये खर्गेंचा समावेश कायमच ठळकपणे दिसून आलेला आहे. जेव्हा २०१४ साली खर्गेंची लोकसभा गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तेव्हा एका काँग्रेस नेत्याने म्हटलं होतं की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला कर्नाटकमधून 9 जागा मिळाल्या होत्या, तेव्हा आमची सभागृहातील एकूण संख्या फक्त 44 होती. त्यामुळे ही नियुक्ती काही प्रमाणात खर्गेंना बक्षिसी म्हणून बहाल करण्यात आली आहे, असं तेव्हा त्या काँग्रेस नेत्याने म्हटलं होतं. 
 
 
ही तर काँग्रेससारख्या दरबारी पक्षाची अपरिहार्यता !
वास्तविक कुठल्याही पक्षाला एक असा व्यक्ती लागतो जो पक्षाच्या आणि जनतेच्या या दोन्ही गरज पूर्ण करू शकेल. पक्षाच्या गरज पूर्ण करण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे गान्धी घराण्याचे डोळे आणि कान बनून अहमद पटेल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. पण अहमद पटेलांच्या पश्चात तसा दुसरा नेता उभा करण्यात काँग्रेसला अद्याप तरी यश मिळालं नाही आणि जी काही नेतेमंडळी आहेत त्यांना दूर सारण्यातच पक्ष आग्रही आहे, हीच मोठी विरोधाभासाची स्थिती मागच्या ८ वर्षांपासून काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे, हेच वास्तव आहे. त्यामुळे खर्गे असो व अहमद पटेल यांच्यासारख्या फार कधीही प्रत्यक्ष मैदानात न दिसणाऱ्या व्यक्तींचं असणं काँग्रेससारख्या दरबारी राजकारण करणाऱ्या पक्षाला किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...