राष्ट्रकुल स्पर्धेतधावपटू हिमा दासचा उपांत्य फेरीत प्रवेश
भारताची बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी
04-Aug-2022
Total Views | 74
41
बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारचा दिवस समिश्र ठरला. सर्वांच्या नजराजस्मिनआणि अमित पंघाल या भारतीय खेळाडूंवर होत्या. भारताची स्टार धावपटू हिमा दास २०० मीटर शर्यतीत २३.४२ सेकंदाची वेळ नोंदवून पहिली आली. तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमित पंघालनं बॉक्सिंगमध्ये त्यानं उपांत्य फेरी गाठलीय. अमितनं ४८-५१ किलो गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला.
धावपटू हिमा दासचा उपांत्य फेरीत प्रवेश
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल १६ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या. हिमा हिट २ मध्ये यशस्वी ठरली. हिट १ मध्ये नायजेरियाची फेवर ओफिली २२.७१ सेकंद आणि हीट ५ मध्ये इलेन थॉम्पसन हेर २२.८० सेकंद मध्ये हिमापेक्षा सरस वेळ नोंदवली. हिमाच्या तुलनेत सहा खेळाडूंनी जास्त चांगली वेळ नोंदवली. त्या सेमीफायनल मध्ये पोहोचल्या आहेत.
टेबल टेनिसमध्ये साथियान आणि मनिका बत्रा या जोडीनं मिश्र दुहेरीत सेशेल्सच्या क्रिया मिक आणि सिनॉन लॉरा या जोडीचा ११-१, ११-३, ७-१ असा पराभव केलाय. या विजयासह भारतीय जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठलीय आहे.
Lovely from Lovlina ❤️#OnThisDay 🇮🇳 Lovlina Borgohain ended her Tokyo 2020 campaign with a third place finish🥉
भारताच्या जस्मिननंही बॉक्सिंगच्या ५७-६० किलो वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासोबतच तिनं भारतासाठी एक पदकही निश्चित केलं आहे. जस्मिननं उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या टोरी ग्रँटनचा ४-१ असा पराभव केला आहे.
बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल दमदार कामगिरी
अमित पंघालनं बॉक्सिंगमध्ये त्यानं उपांत्य फेरी गाठलीय. अमितनं ४८-५१ किलो गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला. अमितनं हा सामना ५-० फरकानं जिंकला. यामुळे भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झाले आहे.