रमेश पतंगे लिखित 'डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` आता संथाली भाषेतही!

    27-Aug-2022
Total Views | 103

Ramesh Patange-Dr.Ambedkar- Droupadu Murmu
 
मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. योगायोग म्हणजे द्रौपदी मुर्मू यांची मातृभाषा ही संथालीच! त्यामुळे रमेश पतंगे यांचे विचार आणि त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडलेले बाबासाहेब आता संथाली भाषीकांपर्यंतही पोहोचले आहेत, ही आजच्या घडीला खूप महत्त्वाची बाब आहे.
 
मराठीत असलेल्या मूळ पुस्तकाचा अनुवाद इंग्रजी, हिंदी, तेलुगु, कन्नड अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये यापूर्वी झाला आहेच. मात्र, संथाली भाषेत अनुवादित झालेले हे पहिले पुस्तक आहे. ‘आंबेडकर : द ग्रेट मिशन इन मेकिंग इंडिया` या प्रा. भीमराव भोसले यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या आधारे सगेन यांनी संथाली भाषेत त्याचा अनुवाद केला. यामुळे डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि त्यांचे कार्य भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे निश्चितच सोपे झाले आहे.
 
बाबासाहेबांच्या राष्ट्रीय योगदानांचा वस्तुनिष्ठ आलेख रमेश पतंगे यांच्या पुस्तकात दिसतो!
बाबासाहेबांचे आजवर जेवढी अद्वितीय अशी राष्ट्रीय योगदान आहेत, त्या सर्वांची नोंद रमेश पतंगे यांनी त्यांच्या पुस्तकात केली आहे. बाबासाहेब हे केवळ कुठल्या एका समूहाचे नसून ते संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानांचा वस्तुनिष्ठ आलेख या पुस्तकातून दिसतो. त्यामुळे रमेशजींचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रासाठीचे योगदान संथाली भाषेतून पहिल्यांदाच पोहोचवले जात आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. इतकेच नव्हे, तर एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत जाण्यासाठी अनुवादन किती महत्त्वाचे ठरते हे यातून प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
- प्रा. भीमराव भोसले, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121