भारतात हल्ल्याची योजना आखणार्‍या ‘इसिस’च्या दहशतवाद्यास रशियामध्ये अटक

    23-Aug-2022
Total Views | 71
 
ISIS terrorist
 
 
नवी दिल्ली : ‘रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने (एफएसबी) सोमवारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बरला ताब्यात घेतले. हा दहशतवादी भारतातील उच्चपदस्थ राजकीय नेत्यांविरोधात हल्ल्याचा कट रचत होता. रशियन वृत्तसंस्था ‘स्पुटनिक’ने याविषयी माहिती दिली आहे.
 
 
’एफएसबी’तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ’एफएसबी’ने रशियामध्ये बंदी घातलेली आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा सदस्य असलेल्या दहशतवाद्यास ताब्यात घेतले. हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशातील मूळ रहिवासी आहे. भारतातील सत्ताधारी राजकीय नेत्यांपैकी एका नेत्यास उडवून देण्याची योजना हा आखत होता, असेही ‘एफएसबी’ने म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याला ‘इसिस’च्या एका नेत्याने तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते.
 
 
दरम्यान, ‘इसिस’ आणि अन्य संबंधितांना दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित केले गेले आहे. ‘युएपीए’ कायद्याच्या पहिल्या अनुच्छेदामध्ये त्याविषयी नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘इसिस’ आपल्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी विविध इंटरनेट-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांकडून ‘सायबर स्पेस’वर बारकाईने लक्ष ठेवले जात असून कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
 
 
 
पाकिस्तानी गुप्तहेरास दिल्लीतून अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या एका व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हा गुप्तहेर हिंदू निर्वासित म्हणून भारतामध्ये राहत होता, भागचंद असे त्याचे नाव असून तो पाकसाठी हेरगिरी करीत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येताच त्यास अटक करण्यात आली आहे. ‘राजस्थान इंटेलिजन्स’ने 46 वर्षीय भागचंदला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीने तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व घेतले होते आणि दिल्लीत राहून तो टॅक्सीचालक म्हणून काम करत होता. आरोपी पाकिस्तानी ‘हॅण्डलर’च्या संपर्कात असून दिल्लीतून महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती भारतीय गुप्तचरांना मिळाली होती.
 
 
याविषयी अधिक माहिती देताना ‘एडीजी इंटेलिजन्स’ उमेश मिश्रा म्हणाले की, भागचंद हा पाकिस्तानी ‘हॅण्डलर्स’च्या संपर्कात होते आणि दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवत होता. भिलवाडा येथून दि. 14 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या नाराणलाल गद्री या व्यक्तीच्या चौकशीतून भागचंदविषयी माहिती उघड झाली होती.दरम्यान, आरोपी भागचंद 1998 मध्ये कुटुंबासह व्हिसावर भारतात आला होता. त्यास तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. गुप्तचर विभागाचे संयुक्त पथक जयपूरमध्ये याची चौकशी करत आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121