महाकालच्या भक्तांनी का सुरू केली #boycottzomato मोहीम?
22-Aug-2022
Total Views | 119
मुंबई: 'फूड डिलिव्हरी' कंपनी 'झोमॅटो'ने हृतिक रोशनसोबत केलेल्या एका आक्षेपार्ह्य जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर माफी मागितली. उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ‘महाकाल की थाली’ वरील जाहिरात मागे घेण्यात आली आहे. जाहिरातीत हृतिक म्हणतो, “मी थाळी खाणार आहे. जर तुम्ही उज्जैनमध्ये असाल तर तुम्ही ती 'महाकाल'कडे मागा”
या जाहिरातीनंतर महाकालेश्वर मंदिराचे पुजारी महेश म्हणाले की, जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. “महाकाल हा देव आहे ज्याची आपण पूजा करतो. महाकाल हा सेवक नाही आणि अन्न पुरवत नाही. कंपनीने आपल्या जाहिरातीत महाकाल मंदिराबाबत दिशाभूल करणारी प्रसिद्धी केली आहे. हिंदू समाज सहिष्णू आहे, तो कधीही हिंसक नसतो. जर दुसरा समुदाय असता तर त्याने अशा कंपनीला आग लावली असती,” ते म्हणाले होते. हिंदू जागृत मंचानेही लोकांना झोमॅटोवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
झोमॅटोने माफीचे निवेदन जारी केले ज्यामध्ये असे लिहिले आहे की, " हा व्हिडिओ त्याच्या संपूर्ण भारतातील मोहिमेचा एक भाग आहे ज्यासाठी आम्ही प्रत्येक शहरातील लोकप्रियतेवर आधारित अग्रगण्य स्थानिक रेस्टॉरंट्स' आणि त्यांचे अग्रगण्य पदार्थ प्रस्तुत केले आहेत. " कंपनीने यावर जोर दिला की ही जाहिरात महाकाल रेस्टॉरंटमधील 'थाळी'चा संदर्भ देते, श्री महाकालेश्वर मंदिराचा नाही."
दुसरीकडे, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. “प्रथम पाहता, सोशल मीडियावर प्रसारित होणारा जाहिरातीचा व्हिडिओ मॉर्फ केलेला दिसत आहे. मी उज्जैनच्या पोलीस अधीक्षकांना व्हिडीओची वस्तुस्थिती पाहून मला अहवाल देण्यास सांगितले आहे जेणेकरुन दोषींवर कारवाई केली जाईल.”