स्पाईसजेटने प्रलंबित थकबाकी भरली; बँक गॅरंटी मिळणार परत!
02-Aug-2022
Total Views | 26
नवी दिल्ली: बजेट एअरलाइन म्हणून ओळख तयार केलेल्या स्पाईसजेटने मंगळवारी दि. ०२ ऑगस्ट रोजी जाहीर केले की त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबत पूर्ण आणि अंतिम समझोता केला आहे. आणि विमानतळ ऑपरेटरची सर्व थकबाकी भरली आहे. स्पाइसजेट दैनंदिन फ्लाइट ऑपरेशन्ससाठी प्रगत पेमेंट यंत्रणेचा अवलंब करणार आहे. प्रलंबित थकबाकी भरण्याची क्षमता अलीकडच्या काळात सुधारित आर्थिक स्थिती दर्शवते.
बोईंग ७३७, क्यू-४०० आणि मालवाहतूक करणारी, गुरुग्राम-आधारित स्पाइसजेट ही प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत अनेक दैनिक उड्डाणे चालवणारी देशातील सर्वात मोठी प्रादेशिक कंपनी आहे. स्पाइसजेटने पाकयॉन्ग, झारसुगुडा, कांडला, दरभंगा, कानपूर, अजमेर (किशनगड) यासह देशाच्या विमान वाहतूक नकाशावर अनेक ठिकाणे जोडली आहेत. परंतु, लवकरच ही कंपनी आपला गाशा गुंडाळणार असल्याची चर्चा सुरू आहे, 'आकासा एअर' चे आगमन आणि स्पाइसजेटचे गमन हे लवकरच होईल अशी चर्चा रंगू लागली आहे. गेल्या महिन्याभरात स्पाईसजेटच्या विमानांबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. जुनी विमाने वापरल्यामुळे हे झाल्याचे सांगण्यात येत आहे.