चतुर्वेदींचे चातुर्य! सत्ता गेल्यावर झाली सावरकरांची आठवण

    16-Aug-2022
Total Views | 88
 
chaturvedi
 
 
मुंबई :महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या जुन्याच गोष्टींकडे परत फिरायला लागली आहे. त्यामध्ये सर्वात वरची कडी केली आहे ती शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी. आधी काँग्रेस मग शिवसेना असा राजकीय उड्यांचा इतिहास असणाऱ्या प्रियांका यांना अचानक सावरकरप्रेमाचे भरते आले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सावरकरांचा सन्मान करणारे उद्गार काढले आहेत. त्यांचे योगदान कधीच कोणी विसरू शकत नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.
 
 
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणीच विसरू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही सावरकरांच्या योगदानाचे महत्व मान्य होते त्यामुळेच त्यांनी आपल्या कारकिर्दीत सावरकरांवरच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले होते. तसेच त्यांच्यावर एक चित्रपटही बनवला होता. त्यामुळे सावरकरांचा त्याग आणि त्यांचे कार्य मोठेच आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. याचबरोबरीने पंतप्रधानांनी केलेला महात्मा गांधींच्या कार्याचा उल्लेख हाही खूप महत्वाचा आहे. आपण कायम गांधीजींच्याच मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे असे मतही प्रियांका यांनी मांडले आहे.
 
 
शिवसेनेला आता सावरकरांची आठवण येणे हा निश्चितच योगायोग नाही, कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्षांसाठी सत्ता उपभोगताना कधीही त्यांचे सावरकर प्रेम दिसून आले नाही. सावरकरांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर टिपण्णी करणाऱ्या काँग्रेससोबत सत्ता उपभोगताना स्वतःची वैचारिकता विसरणाऱ्या शिवसेनेला आतातरी त्यांच्या खऱ्या आदर्शांची आठवण झाली, हेही नसे थोडके.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121