ओलाच्या बहुप्रतिक्षित पहिल्या इलेक्ट्रिक कारची घोषणा
15-Aug-2022
Total Views | 76
19
नवी दिल्ली : भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ओला ने बहुप्रतिक्षित पहिली इलेक्ट्रिक कार घोषणा केली. ५०० किलोची रेज असलेली ही कार कंपनीच्या मते २०२४ मध्ये भारतात येईल. तसेच एस-१ या नवीन स्कुटर आणि बॅटरी घोषणा यावेळी केली. ओलाचे सीईओ आणि सहसंस्थापक भाविश आग्रवाल यांनी भारतात ईव्ही क्रांती आणण्याबाबत बोलले. तर ओला फ्युचर कारखाना भाविष्यात १० ईव्ही कार बनवण्याचा दावा केला आहे.
आग्रवाल केल्या काही दिवसांपासुन घोषणेबद्दलचे टीझर पोस्ट करत होते. नवीन ईव्ही कार येण्याआधी काही वेळ लागेल असे दिसते. ओलाने उघड केलेले एकच तपशील की कार चार सेकंदात ० ते १०० पर्यंत जाईल आणि ५०० किलोमीटरची श्रेणी असेल. परंतु कार २०२४ मध्ये येईल, याचा अर्थ हे अद्याप विकासात असलेले उत्पादन आहे.
ओलाकडे आधीच ईव्ही स्कूटर्स बाजारात आहेत, तरीही गेल्या काही महिन्यांपासून या उत्पादनांबद्दल सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार ओला इलेक्ट्रिक कार एक भविष्यवादी दिसणारी डिझाईन असेल आणि आकार लहान हॅचबॅक सारखा असेल, अशी अपेक्षा आहे. अग्रवाल यांनी जानेवारीमध्ये कारसाठी एक डिझाइन ट्विट केले होते.