मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता सुमित राघवन सोशल मिडीयावर राजकीय - सामाजिक विषयांवर आपली अनेक मते मांडत असतो. या सगळ्यात सुमितने लिहिलेली एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. नुकताच आमीर खानचा लालसिंह चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आणि याचा परिणाम होतोय तो म्हणजे सुमित राघवनच्या 'एकदा काय झालं!!' या चित्रपटावर. या चित्रपटाला कुठेही थिएटर मिळत नाहीये. त्यामुळे सुमितने नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे.
सुमित राघवन आपल्या पोस्ट मध्ये म्हणतोय की, ''एकदा काय झालं!!' या चित्रपटावरच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, जिथे पिकते तिथे विकत नाही. आज आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला तरी त्याला थिएटर नाही! मुंबईमध्ये जेमतेम ३ शो त्याला मिळालेत, ठाण्याला एखादा आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला थिएटरच नाही. या हिंदी सिनेमांसाठी आमचा बळी जातोय.'
तर या चित्रपटाचे संगीतकार सलील कुलकर्णी आणि अमित खोपकर यांनी थिएटर मिळत नाही म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंदीच्या बॉयकोटचा ट्रेंड सुरु असलेल्या चित्रपटांना 'रक्षाबंधन' आणि 'लालसिंह चढ्ढा' बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहेत पण मराठीवर अन्याय का! हा प्रकार थांबायला हवा. असे मत मराठी कलाकार व्यक्त करत आहेत.