पुणे: आज आपण कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महाबळेश्वर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत चर्चा केल्याची माहिती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे दिली.शिवसेना पक्ष बाबत विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, त्यात प्रामुख्याने जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितले की, दीपक केसकर यांची मी पुण्यात भेट घेतली. वेगवेगळ्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाली,यात जागतिक पातळीवर प्रख्यात महाबळेश्वरबाबत चर्चा केली आहे. या ठिकाणी वर्षाकाठी जवळपास ५० लाख पर्यटक येतात. त्यात आणखी भर कशी पाडता येतील, आणखी काय उपाययोजना करता येतील. पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना कसा रोजगार उपलब्ध करता येईल? यावर चर्चा झाली.
उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक प्रतिप्रश्न देखील उदयनराजेंनी यावेळी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.