कसे आहे भारताचे 'व्हर्च्युअल हर्बेरियम' ; जाणून घ्या

देशातील वनस्पतींचा सर्वात मोठा डेटाबेस; जागतिक स्तरावर ख्याती!

    10-Aug-2022   
Total Views |
हेर
 
मुंबई: भारतात वनस्पतींचे आभासी हर्बेरियम (माहिती सहित साठवलेले विविध वनस्पतींच्या पानांचे नमुने) या वर्षी जुलै महिन्यात लॉन्चलौंच करण्यात आले. या संग्रहात सुमारे एक लाख फोटोंचा डेटाबेस आहे. फक्त भारतातच नाही, तर जग भारत या हर्बेरियमचा अभ्यास होत आहे. आता पर्यंत ५५ देशातून तब्बल दोन लाख लोकांनी ही वेबसाईट वापरली आहे. भारतातील एकूण एक वनस्पतींच्या नमुन्यांच्या छायाचित्रासहित माहितीचा संग्रह या व्हर्च्युअल हर्बेरियम'द्वारे केला जात आहे.
 
 
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) च्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या इंडियन व्हर्च्युअल हर्बेरियमचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते दि. १ जुलै रोजी कोलकाता येथे करण्यात आले. https://ivh.bsi.gov.in असे याचे संकेत स्थळ आहे.
 
भारतीय व्हर्च्युअल हर्बेरियम हा देशातील वनस्पतींचा सर्वात मोठा आभासी डेटाबेस आहे. आणि लोकांमध्ये खूप स्वारस्य निर्माण करत आहे. हा एक महत्वाकांक्षी आणि लक्षवेधी प्रयत्न ठरत आहे. वनस्पती वर्गीकरण, संवर्धन, अधिवासाची हानी आणि अगदी हवामान बदलासाठी हर्बेरियमचे नमुने हे महत्त्वाचे साधन ठरतील. डिजिटल साधने आपल्याला आपल्या मुळांशी जोडण्यात कशी मदत करू शकतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीय व्हर्च्युअल हर्बेरियमबद्दल बोलताना म्हंटले आहे. दि.३१ जुलै रोजी झालेल्या ‘मन की बात’च्या भागात पंतप्रधानांनी या अभिनव उपक्रमाबद्दल सांगितले. "मला खात्री आहे की भारतीय व्हर्च्युअल हर्बेरियम हे देशातील वनस्पतींवरील संशोधनासाठी एक महत्त्वाचे साधन ठरेल." असे पंतप्रधान मोडी म्हणाले.
 
 
डिजिटल हर्बेरियममधील प्रत्येक रेकॉर्डमध्ये जतन केलेल्या वनस्पतीच्या नमुन्याची प्रतिमा, वैज्ञानिक नाव, संकलन परिसर आणि संग्रह तारीख, संग्राहकाचे नाव आणि बारकोड क्रमांक समाविष्ट असतो. डिजिटल हर्बेरियममध्ये राज्यानुसार डेटा काढण्याची वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत आणि वापरकर्ते त्यांच्या स्वतःच्या राज्यातील वनस्पती शोधू शकतात ज्यामुळे त्यांना प्रादेशिक वनस्पती ओळखण्यात आणि प्रादेशिक चेकलिस्ट तयार करण्यात मदत होईल.
 
 
हेर 1
 
 
 
भारतीय व्हर्च्युअल हर्बेरियमचा देशाच्या वनस्पति इतिहासाशीही खोलवर संबंध आहे. या पोर्टलद्वारे आपण 'विल्यम रॉक्सबर्ग', 'नॅथॅनियल वॉलिच', 'जोसेफ डाल्टन हूकर' यांसारख्या वनस्पतिशास्त्रज्ञांचे सर्वात मौल्यवान ऐतिहासिक संग्रहाचे जतन केले आहे. ही माणसं भारतातील वनस्पतिशास्त्राचे संस्थापक मानले जाते. डिजिटल हर्बेरियममध्ये १६९६च्या सुरुवातीचे काही सर्वात जुने वनस्पति नमुने आहेत. 'सायपेरस प्रोसेरस' नावाचे वनस्पती तर चेन्नईजवळ १५ ते २० जून १६९६ दरम्यान गोळा करण्यात आले होते. लेपिडागॅथीस स्कॅरीओसा'चा नमुना रॉबर्ट वेट यांनी १८१७ मध्ये गोळा केला होता. या संग्रहातील नमुने नवीन शोधांमध्ये मदत करतात.
 
आणि वनस्पतिशास्त्रज्ञ आणि वर्गीकरणशास्त्रज्ञांसाठी ते खूप महत्त्वाचे ठरतात मानले जाते. संशोधकांना त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी नावांच्या प्रकारांचे परीक्षण करणे आवश्यक आहे. इंडियन व्हर्च्युअल हर्बेरियमने प्राधान्य म्हणून, त्याच्या प्लॅटफॉर्मवर २९, ६१५ प्रकारच्या नमुन्यांचे फोटो असलेली माहिती डिजिटल केली आहे. हर्बेरियम क्रिप्टोगॅम्स (स्पोर बेअरिंग प्लांट्स) सारख्या विविध श्रेणीतील वनस्पतींबद्दल माहिती प्रदान करते. फॅनेरोगम्स (बीज असणारी वनस्पती). दोन्ही गट पुन्हा दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत ज्यात वंशाचा समावेश आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की देशात अंदाजे तीस दशलक्ष वनस्पतींचे नमुने आहेत जे बीएसआयच्या झोनल केंद्रांवर आणि पश्चिम बंगालमधील हावडा येथील आचार्य जगदीश चंद्र बोस इंडियन बोटॅनिक गार्डन येथे असलेल्या सेंट्रल नॅशनल हर्बेरियममध्ये आहेत.
 
  
 
“पोर्टलमध्ये हर्बेरियमच्या नमुन्यांच्या सुमारे एक लाख फोटोंचा समावेश आहे; आणि या वर्षाच्या अखेरीस डिजीटल प्रजातींची संख्या दोन लाखांपर्यंत वाढेल. “२०२४ पर्यंत, आम्ही देशातील सर्व हर्बेरियांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहोत जेणेकरून ते त्यांचे वनौषधी संग्रह प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू शकतील,”
 डॉ. ए.ए. माओ,संचालक, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया 
 
“नमुन्यांच्या डिजिटायझेशनवर काम २०१९ मध्ये सुरू झाले आणि बहुतेक डिजिटलायझेशन बीएसआयने केले आहे. आमच्या प्रकारचे सुमारे ५२टक्के नमुने हे परदेशी आहेत आणि ते ब्रिटीश काळात जगातील ८२ देशांमधून गोळा केले गेले होते,"
कुमार अविनाश भारती, शास्त्रज्ञ, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.