पक्षप्रवेशाच्या नावाखाली आदित्य ठाकरेंकडून बनवाबनवी !

शिवसैनिकांचाच शिवसेनेत प्रवेश - भाजप

    01-Aug-2022   
Total Views | 402
 
Aditya Thackeray
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेतील ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून आमदार खासदारांच्या पाठोपाठ आता पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरेंना रामराम ठोकायला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून दिल्या जाणाऱ्या शहाला काटशह देण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळीतील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पोस्ट्स समाज माध्यमांवर झळकत असून ते पदाधिकारी भाजपचे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आदित्य ठाकरेंकडून केले जाणारा दावा म्हणजे निव्वळ बनवाबनवी असल्याचा आरोप वरळी भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
 
 
शिवसैनिकांचाच शिवसेनेत प्रवेश - भाजप
'आदित्य ठाकरेंकडून पक्षप्रवेशाच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या पोस्ट केवळ दिशाभूल करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींची नावे घेऊन त्यांना भाजपचे पदाधिकारी दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते पदाधिकारी म्हणजे सध्याचे शिवसैनिकच असून केवळ केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत. प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा भाजपशी काडीमात्र संबंध नसून हा प्रकार म्हणजे शिवसैनिकांनीच शिवसेनेत प्रवेश करण्यासारखा आहे,' असे प्रत्युत्तर वरळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मदन गुप्ता यांनी दिले आहे.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121