मोंड गावातून एक संशयित आरोपी ताब्यात

गेल्या आठवड्यात सापडला होता बिबट्याचा मृतदेह

    08-Jul-2022
Total Views | 87
leop
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): जून महिन्याच्या सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब होते. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला. पुढील तपासात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
 
खाडीकिनारा परिसारत विचित्र असा कुजलेला वास पसरला होता. खाडी जवळ एका सिमेंटच्या पोत्यातून हा वास येत असल्याचे समोर आले. मोंड पोलीस पाटील जितेंद्र राणे यांनी देवगड पोलीस स्टेशनला कळवले. देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रशांत जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी जागेची पाहणी केली. या दरम्यान या पोत्यातबिबट्याचा मृतदेह असल्याचे समजले. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
 
 
वन विभागाने केलेल्या तपासा दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महेश घाडी नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीच्या घरी छापा टाकल्या असता, सांबराच्या अर्धवट कवटीसह शिंगांची जोड आणि रानडुक्कराचा सुळा आढळून आला. या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी महेश घाडी याला अटक करण्यात आली आहे. हा तपास सावंतवाडी प्रभारी उपवनसंरक्षक, दिपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या तपासात प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी अ. पां. शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली रा.द. घुणकीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी म.अ. क्षिरसागर, वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल, अ. बा. कटके, वनपरिमंडळ अधिकारी देवगड सा. चाँ. फकीर यांचे योगदान आहे.
 
 
या बिबट्या हत्येबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी मो. ९५४५९७७८७७ किंवा ९४२२०५०५८१ या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्येयात येईल , आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121