मुंबई मेट्रो ३ लवकरात लवकर सुरू व्हावी: सुमीत राघवन

    04-Jul-2022
Total Views | 61
Sumeet
 
 
 
मुंबई: मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. सीने सृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते सुमित राघवन यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबई मेट्रो ३ लवकरात लवकर सुरू व्हावी ही सामान्य मुंबईकरांची इच्छा आहे.
 
 
वेळ, पैसा, आणि जिव याला काही महत्व आहे की नाही असा सवाल उपस्थित करत, मेट्रो कारशेड आरेत झाले पाहिजे. आणि लवकरात लवकर झाले पाहिजे. असे सुमीत राघवन म्हणाले. : मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. सुमीत राघवन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून विनंती केली. ''कळकळीची विनंती करतोय की आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही. जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे.'' आधीच झालेल्या उशिरामुळे राज्याच्या तिजोरीला, दहा हजार कोटींची झळ बसणार आहे. त्यात आणखीन विलंब होऊ नये ही मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121